एक्स्प्लोर

Sharad Pawar on Narendra Modi : गॅस सिलेंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेलाय, मोदींचा पराभव करण्याची आपली जबाबदारी, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल

Sharad Pawar on Narendra Modi , Rawer : सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. गॅस सिलेंडरचा भाव आज काय आहे? गॅस सिलेंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेलाय.  मोदींचा पराभव करण्याची आपली जबाबदारी आहे.

Sharad Pawar on Narendra Modi , Rawer: "सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. गॅस सिलेंडरचा भाव आज काय आहे? गॅस सिलेंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेलाय.  मोदींचा पराभव करण्याची आपली जबाबदारी आहे. मोदींनी आश्वासनं दिली मात्र ती पाळली नाहीत. मोदींचे राज्य हे वेगळ्या दिशेने चालला आहे. मोदींना त्यांच्याविरुद्ध टीका केली की आवडत नाही, त्यांना सहन होत नाही. झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांनी टीका केली. दिलीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी टीका केली. त्यांना जेलमध्ये टाकले", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. रावेरमध्ये महाविकास  आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील (Shreeram Patil) यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी मी आलो आहे. स्वातंत्र्योत्तर काळाची चळवळ झाली त्यात खानदेशाचे मोठे योगदान होतं. मुंबई काँग्रेसच्या दिवशी झाला त्यानंतर इतर ठिकाणी मात्र फैजपूर येथे अधिवेशन झालं ते ऐतिहासिक होतं.  या अधिवेशनाला महात्मा गांधी पंडित , जवाहरलाल नेहरू , हे नेते हजर होते.

श्रीराम पाटील यांना मोठा मताधिक्याने तुम्ही विजयी करावं

रावेरमध्ये आमच्या लोकांसाठी वेगळी जागा आहे. श्रीराम पाटील यांना मोठा मताधिक्याने तुम्ही विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मला भुसावळला येण्याची संधी मिळाली. भारताच्या लोकसभाच्या निवडणुकीकडे जागाचे लक्ष आहे. इथे कोणते सरकार येणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे जनतेनेही त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

मोदींनी सांगावं दहा वर्षात काय केलं?

मोदी साहेब देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत,पण जावून सांगतात काय? मोदींनी सांगावं दहा वर्षात काय केलं? 2014 मध्ये यांनी काय केलं. तेव्हा आम्ही सत्तेत होतो आणि ते म्हणण्याचे आम्ही महागाई आणली. मोदी म्हणाले होते मला सत्ता द्या मी भाव देतो. मात्र घोषणा उलटली काही झालं नाही, असं पवारांनी नमूद केलं. 

राज्यात आपल्याला परिवर्तन करायचे आहे

जवाहरलाल नेहरू व गांधींची टिंगल टवाळी करत करायची, आमची टिंगल करायची. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची. काहीही टीका करतात. अमित शहा म्हणतात मी अयोध्या राम मंदिरात गेलो नाही. आम्हाला आदर आहे . राम मंदिराचे काम पूर्ण झालं की नक्की जावू. मोदी साहेब आणि त्यांच्या उमेदवाराचा पराभव करण्याची जबाबदारी आपली आहे. राज्यात आपल्याला परिवर्तन करायचे आहे. देशात जे लोक नुसत्या घोषणा करता की हे करू आणि काय करत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी व त्यांच्या माणसांना सत्तेपासून आपल्याला दूर ठेवायचं आहे एवढेच विनंती करतो, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

समुद्राखाली जाऊन ड्रामा, पवारांवर टीका, रेवण्णा; पुण्यातून राहुल गांधींची मोदींवर फटकेबाजी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget