मोदी म्हणाले शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, पण मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, शरद पवारांचा टोला
Sharad Pawar on Narendra Modi : "एकदा मोदी म्हणाले शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, पण माझा माझ्या बोटावर पुर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.
Sharad Pawar on Narendra Modi : "एकदा मोदी म्हणाले शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, पण माझा माझ्या बोटावर पुर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. छत्रपती संभाजीनगरमध्ये लेखक शेषराव चव्हाण यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.
कायद्याचा गैरवापर केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने अमित शहाला तडीपार केलं होतं
शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे, त्यांच्या विचारात बदल झालेला नाही. आठ दिवसांपूर्वी अमित शाहांनी माझ्यावर टीका केली. माझ्याबाबत काहीतरी बोललं गेलं. ते म्हणाले की, देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत. आश्चर्याची बाब आहे. गुजरात दंगल झाली होती. त्यावेळी कायद्याचा गैरवापर केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने अमित शहाला तडीपार केलं होतं. तोच माणूस आज देशाचा गृहमंत्री म्हणून देशाचं रक्षण करत आहे.
शेवटी मी त्यांना म्हणाले देशातील जनतेने संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर दिलीये
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शरद पवार म्हणाले, काही गोष्टी अशा असतात जिथे कठिण पाऊलं उचलण्याची आवश्यकता असते. मी अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा देशाचा संरक्षण मंत्री होतो. वॉशिंग्टनमध्ये माझं विमान उतरलं. तिथे एक पद्धत असते. जेव्हा एखाद्या देशाचा संरक्षण मंत्री दुसऱ्या देशात जातो, तेव्हा त्याला सॅल्यूट करण्यासाठी तेथील आर्मीची टीम उभी राहते. मी विमानातून उतरलो. तिथे त्यांच्या आर्मीची टीम उभी होती. त्यांनी मला सॅल्यूट केला. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. तिथे आर्मीचे 200 जवान होते. त्यातील एकही जवान नव्हता, सर्व मुली होत्या. त्यांनी आर्मीची जबाबदारी मुलींवर दिलीये. मी विचार सुरु केला की, भारतात का होऊ शकत नाही? संरक्षण मंत्रालयात एक पद्धत आहे, प्रत्येक सोमवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयाच्या कार्यालयात चार लोक एकत्र येतात. तीन सैन्य दलाचे प्रमुख असतात. त्याठिकाणी देशाच्या सुरक्षेबाबत चर्चा होते. इतर देशांबाबतही चर्चा होते. मी अमेरिकेहून आल्यानंतर मी चर्चा केली. मी त्यांना म्हणालो अमेरिकेत संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी मुली येतात. मग भारतात का नाही? असं मी त्यांना विचारलं. त्यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी हे होणार नाही, असं सांगितलं. मुली हे काम करु शकणार नाहीत , असं म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे. तुम्ही विचार करा. काही महिन्यांनंतरही त्यांचा विचार तसाच होता. शेवटी मी त्यांना म्हणाले देशातील जनतेने संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर दिलीये. निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे. माझ्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही आता पाहा, 26 जानेवरी रोजी दिल्लीत जी परेड असते, त्याचं नेतृत्व मुली करतात, असंही शरद पवारांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या