एक्स्प्लोर

NCP Crisis Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांना वारं फिरल्याची जाणीव झाली अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचालींना सुरुवात?

NCP party Ajit Pawar: अजित पवार यांनी शरद पवार यांच्या गटाकडून सुरु असलेल्या युतीच्या हालचालींविषयी शंका बोलून दाखवली आहे. शरद पवारांशी सध्या युती करण्याचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar Alliance: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी अलीकडेच, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रिया किंवा धोरण ठरवण्यात सहभागी होत नाही, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे आता आमच्या गटाला अजित पवारांसोबत जायचे असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे (Supriya Sule) घेतील, असे सांगत पवारांनी सर्व सूत्रं नव्या पिढीच्या हाती सोपवली होती. तेव्हापासूनच अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, याविषयी अजितदादा गटातील (Ajit Pawar) एका नेत्याने वेगळाच दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरु असाव्यात. त्यामुळे शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच करण्यात आले असावे, अशी शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. यावर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 

मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही, अशी माहिती अजित पवार यांनी आमदारांना दिली. आगामी निवडणुकांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले पाहिजे, अशी काही आमदारांची भूमिका आहे. परिणामी   पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्यं आली असतील, असे अजित पवार यांनी या बैठकीत म्हटल्याचे समजते.

Ajit Pawar: अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच साप्ताहिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री महोदय, खासदार, आमदार तसंच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांशी सविस्तर संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तात्काळ तयारीला लागण्याचे निर्देश दिले. 

पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. युवक-युवती, शेतकरी-कष्टकरी तसंच समाजातील सर्व घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आहे.

Sharad Pawar Camp: शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक

एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली. आज दुपारी दोन वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंथन होणार का याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. अलिकडेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी अतिशय सूचक विधान केलं होते. सत्तेत रहायचं की नाही याबाबत सुप्रिया आणि अजितने बसून निर्णय घ्यावा असं अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर मुंबईतील सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसून आले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील झाल्याचं दिसून आले. ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी आहे का, असा प्रश्न डोकं वर काढतोय.

आणखी वाचा

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर...; पुतणे रोहित पवारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; नेमकं काय म्हणाले?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Doctor Case: 'तू बीडची म्हणून सर्टिफिकेट देत नाहीस', महिला डॉक्टरवर कोणत्या खासदाराने दबाव टाकला?
Phaltan Doctor Case: 'PSI बदनेवर बलात्काराचा आरोप, निंबाळकरांनी धमकावलं का?'; प्रकरण तापलं
Satara Doctor Case : 'दोषींवर कठोर कारवाई होणार, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
Satara Doctor Case : 'पुरावा मिळाला तर सोडणार नाही', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा
Satara Doctor Case : '...राजकारण केलं जातंय', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी रणजित Nimbalkar यांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती
1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Embed widget