एक्स्प्लोर

'भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न'; सुप्रिया सुळे कडाडल्या, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

Supriya Sule: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

Supriya Sule: मणिपूरमधील हिंसाचाराबाबत (Manipur Voilance) केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांना अनेकवेळा केली आहे, असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे. काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

शरद पवारांवर जनतेने प्रेम आणि विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे. त्याची ही पोहोचपावती आहे. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे एक हक्काचा माणूस म्हणून बघितलं जातं, पण जरी वेगळा पक्ष असला तरी आणखी एक आपला हक्काचा माणूस आहे, ते म्हणजे नितीन गडकरी.  तसेच बारामतीचा जागा कुठला पक्ष लढवणार हे अजून निश्चित झालेलं नाहीय. गणेशोत्सवानंतर यावर चर्चा होईल. कोण-किती जागा लढवणार, यावर निर्णय झाला आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली. 

देशात चाललं तरी काय? 

अनेक वेळा आपल्याला अस्वस्थ करणारी परिस्थिती असते. अन्याय झाला असं वाटतं. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला.  हा देश संविधानानेच चालणार कुठल्याही आदर्श शक्तीच्या मनमर्जी न चालणार नाही. संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, नेहमी सत्याचाच विजय होतो. काहीही झालं तरी आम्हाला न्याय मिळेल. न्यायालयाने आम्हाला लवकर न्याय द्यावा, असं असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. 

राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का-

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले आहे. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Ajit Pawar: मोठी बातमी: मुस्लीम समाजाविषयी 'गरळ' ओकणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर अजित पवार नाराज, थेट दिल्लीत तक्रार करणार
मुस्लीम समाजाविरोधात आक्रमक बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर अजित पवार नाराज, थेट दिल्लीत तक्रार करणार
मोठी बातमी: उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मोठी बातमी: उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
Lebanon Pager Blast: इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी
इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Vidhansabha Seat : जवळपास जागा निकाली, 138 जागांंचा महायुतीचा तिढा जवळपास सुटलाABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 14 September 20249 Seconds 90 Superfast News | Maharashtra Superfast news | 19 September 2024Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Ajit Pawar: मोठी बातमी: मुस्लीम समाजाविषयी 'गरळ' ओकणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर अजित पवार नाराज, थेट दिल्लीत तक्रार करणार
मुस्लीम समाजाविरोधात आक्रमक बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर अजित पवार नाराज, थेट दिल्लीत तक्रार करणार
मोठी बातमी: उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मोठी बातमी: उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
Lebanon Pager Blast: इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी
इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी
Ashwini Jagtap: शरद पवारांचा भाजपला चिंचवडमध्ये धक्का? विद्यमान आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार? चर्चांना उधाण
शरद पवारांचा भाजपला चिंचवडमध्ये धक्का? विद्यमान आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Election : सीएम शिंदेंना पाठिंबा दिलेल्या महायुतीमधील सहयोगी आमदाराच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता! कोणत्या जिल्ह्यात टेन्शन वाढणार?
सीएम शिंदेंना पाठिंबा दिलेल्या महायुतीमधील सहयोगी आमदाराच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता! कोणत्या जिल्ह्यात टेन्शन वाढणार?
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Embed widget