Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. यानिमित्त शरद पवार यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लोकसभेत देखील शरद पवारांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. तर दुसरीकडे शरद पवारांचे दुरावलेले कुटुंब देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आले. आज दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), मुलगा पार्थ पवार (parth Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील उपस्थित होते. यामुळे वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमल्याचे दिसून आले. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले. यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पवार कुटुंबीय आमनेसामने आल्याचे देखील पाहायला मिळाले. प्रचारादरम्यान पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी देखील केली. मात्र आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 






पार्थ पवारांनी दिल्या शरद पवारांना शुभेच्छा


आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना 'एक्स' या समाजमाध्यमावर खास शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. 






छगन भुजबळांकडूनही शरद पवारांना शुभेच्छा 


दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना 'एक्स' या समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या आहे. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! या वाढदिवसानिमित्त आपल्या उत्तम आरोग्याची व दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा  


Ajit Pawar: काकांच्या भेटीनंतर अजित पवार अमित शाहांच्या भेटीला संसदेत, तर मुख्यमंत्री फडणवीस मोदींच्या घरी, दिल्लीत भेटीगाठींना वेग