एक्स्प्लोर

शंकराचार्य-ठाकरे भेटीनं भाजपची गोची; शेलार म्हणाले, माझी लायकी नाही, हिंदुत्त्वावरही बोलले

ज्योतीर्मठाचे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली.कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो

मुंबई : ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Jyotirmatha shankaracharya Avimukteshwaranand) यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांचा पाहुणचार स्वीकारला. या भेटीवेळी बोलताना, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे,  जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने भाजपकडून हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप केला जात आहे. आता, ज्योतीर्मठाच्या शं‍कराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपाला अस्सखलीत उत्तर दिलंय. त्यामुळे, या भेटीवर भाजपची नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता, भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, शं‍कराचार्यांवर बोलण्याची आपली लायकी नाही, असेही ते म्हणाले. 

ज्योतीर्मठाचे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली.कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले होते. तसेच, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत दु:ख जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आता, शंकराचार्यांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''मी त्यांच्या विधानावर टिप्पणी करणार नाही, माझी तेवढी लायकी नाही. पण मुंबई व महाराष्ट्रात स्पष्टता आहे की, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले आहे. ठराविक मतांचं लांगुलचालन करण्यासाठी त्यांनी हिंदूत्व व बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत,'' अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली. त्यामुळे,  ठाकरे आणि शंकराचार्य यांच्या भेटीनंतर भाजपची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे. प्रतिक्रिया देतानाही, प्रतिक्रिया टिप्पणी करणार नाही, असे त्यांना म्हणावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

काय म्हणाले शंकराचार्य

आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे . सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे , याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो   त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो.  जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो.  जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhava Teaser: भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्समध्ये दाखल
सीताराम येचुरी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्समध्ये दाखल
Thane Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न, ब्ल्यूटूथ चिकटपट्टीनं मांडीला चिकटवली अन् कॉपी केली; रंगेहाथ पकडलं, गुन्हा दाखल करुन अटक
ब्ल्यूटूथ चिकटपट्टीनं मांडीला चिकटवली अन् कॉपी केली; रंगेहाथ पकडलं, गुन्हा दाखल करुन अटक
टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला परराज्यातून धमकीचे फोन; व्हिडीओ शेअर करत अनिकेत भोसले म्हणाला...
टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला परराज्यातून धमकीचे फोन; व्हिडीओ पोस्ट करत अनिकेत म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nawab Malik : पिठलं, भाकरी नि पुरणपोळी! मलिकांसह दादांचं पंगतीत जेवणMajha Gao Majha Jilha : माझा गाव माझा जिल्हा : जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा 6. 30AM 20 August  2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines PM 20 August 2024Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhava Teaser: भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्समध्ये दाखल
सीताराम येचुरी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्समध्ये दाखल
Thane Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न, ब्ल्यूटूथ चिकटपट्टीनं मांडीला चिकटवली अन् कॉपी केली; रंगेहाथ पकडलं, गुन्हा दाखल करुन अटक
ब्ल्यूटूथ चिकटपट्टीनं मांडीला चिकटवली अन् कॉपी केली; रंगेहाथ पकडलं, गुन्हा दाखल करुन अटक
टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला परराज्यातून धमकीचे फोन; व्हिडीओ शेअर करत अनिकेत भोसले म्हणाला...
टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला परराज्यातून धमकीचे फोन; व्हिडीओ पोस्ट करत अनिकेत म्हणाला...
VIDEO: भर पत्रकार परिषदेत अचानक स्टेजवरच कोसळला काँग्रेस नेता; हृदयविकाराच्या झटक्यानं जीव गमावला
VIDEO: भर पत्रकार परिषदेत अचानक स्टेजवरच कोसळला काँग्रेस नेता; हृदयविकाराच्या झटक्यानं जीव गमावला
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
Embed widget