Satara Lok Sabha Election : साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपकडून अखेर उमेदवारी जाहीर
Satara Lok Sabha : खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Satara Lok Sabha : सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटल असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
उदयनराजेंनी तीन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता
दयनराजेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सातारा लोकसभेत शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर उदयनराजेंच्या नावाची घोषणा कधी होणार याची चर्चा रंगली होती. भाजपची यादी आली आहे त्या यादीमध्ये महाराष्ट्रातून उदयनराजेंचे नाव समोर आले आहे. उदयनराजे येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरणार आहे. राज्यातील ज्या काही तीन चार मतदारसंघांवरून महायुतीचं घोडं अडलं होते. त्यापैकी एक म्हणजे सातारा. सातारा मतदारसंघ (Satara Lok Sabha Election) अजित पवारांच्या वाट्याला जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) तीन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव-2024 के लिए 12वीं सूची में निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/VdGHChERQa
— BJP (@BJP4India) April 16, 2024
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स संपला
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स संपला आहे. साताऱ्यात अजित पवारांनाही (Ajit Pawar) मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती. अखेर आज भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवत उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केली. आता महायुतीतील तिढा वाढली की संपला हे आताच सांगणे कठीण जाणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या बदल्यात कोणती जागा मिळणार या बाबत सस्पेन्स काम आहे
मात्र, त्याबदल्यात अजित पवारांच्या गटाला नाशिकची उमेदवारी दिल्याची चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा :