'सांगली'वरून वाद पेटला असताना संजय राऊतांची विश्वजित कदमांना फोनाफोनी; सोनहिरा कारखान्यावर पोहोचले
शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावरील स्मृतीस्थळास अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
Sanjay Raut and Vishwajeet Kadam, Sangli : ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देत कुरघोडी केल्यानंतर महाविकास आघाडीत वादंग सुरु झालय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ सांगलीत सभांचा धडाकाच सुरु केलाय. या सभांतून राऊत यांनी भाजप नेते संजयकाका पाटील यांच्यासह काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यासह विशाल पाटलांवरही हल्लाबोल केलाय.
संजय राऊतांची विश्वजीत कदमांना फोनाफोनी
शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावरील स्मृतीस्थळास अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यानंतर संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी थेट विश्वजीत कदमांना फोनाफोनी सुरु केली आहे. संजय राऊत सांगली दौऱ्यावर पोहोचताच विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी दिल्ली गाठली होती. त्यामुळे मविआत सांगलीच्या जागेवरुन सुरु असल्याला वाद आता तरी मिटणार का? असा सवाल उपस्थित केला जोतोय.
संजय राऊतांचा संजयकाकांसह विशाल पाटलांवर हल्लाबोल
संजय राऊतांनी सांगलीत सभा घेऊन भाजप उमेदवारी संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांना लक्ष केले आहे. खासदारकी सहकार सम्राटांची मक्तेदारी नाही, सांगलीतील लोकांना बदल हवा आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजप उमेदवारावर केला आहे. तर राऊत यांनी काँग्रेस नेत्यांनाही खडेबोल सुनावले आहेत.
आपले विमान 5 वर्ष कुठे भरकटले होते?
संजय राऊत सांगलीतील सभेत म्हणाले, भाजपचे लोक एक नंबरचे खोटारडे आहेत. 10 वर्षांपासून सांगलीची जागा काँग्रेस पक्षाने लढवलेली नाही. वसंतदादाच्या वारसदाराचा झालेला पराभव आम्हालाही सहन होत नाही. काँग्रेसला सांगलीमधील केडरची चिंता होती तर, 2019 सालीच काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याऐवजी हातपाय का हलवले नाहीत? आपले विमान 5 वर्ष कुठे भरकटले होते? असा सवालही संजय राऊत यांनी विशाल पाटील यांना केला.
कोल्हापुरची जागा ठाकरे गटाने काँग्रेसला सोडली
कोल्हापुरची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शाहू महाराजांचा मान राखत काँग्रेस पक्षाला सोडली आहे. त्यामुळे त्याच्या बदल्यात सांगलीतून उमेदवार दिला जात असल्याचे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी म्हटले होते. सांगलीशिवाय ठाकरे गटाने हातकणंगलेमध्येही उमेदवार दिला आहे. हातकणंगलेमध्ये ठाकरेंनी सत्यजीत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या