Sanjay Raut on Praful Patel : अंगूर खट्टे है म्हणत डिवचणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर राऊतांचा बोचरा वार; म्हणाले, हे गांX लोक, आमच्या...
Sanjay Raut on Praful Patel : अंगूर खट्टे है! माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, असे प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना म्हटले होते.

Sanjay Raut on Praful Patel : वक्फ विधेयकावरून (Waqf Amendment Bill 2025) राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्या तोफ डागली होती. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन, असे त्यांनी म्हटले होते. संजय राऊतांच्या टीकेवर प्रफुल्ल पटेल यांनी अंगूर खट्टे है... माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, असे प्रत्युत्तर दिले होते. आता संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांच्यावर घणाघात केलाय.
संजय राऊत म्हणाले की, मला पवार साहेबांनी माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता. हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत. मला डरपोक लोकांशी बोलायचं नाही. त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे आमचा माईक बंद होता. नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असतं. मी त्याला उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने प्रफुल्ल पटेल हे तसे काय फार मोठे योद्धे आहेत, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनी जाऊन युद्ध जिंकून आले आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले असे जे काही दाखवले आहे, ते मी ओळखतो. हे सर्व लोक गांX आहेत. डरपोक, आमच्याशी काय लढत आहेत, असा घणाघात त्यांनी केलाय.
माझ्या नादाला लागू नका
संजय राऊत पुढे म्हणाले की, हे म्हणत होते, रंग बदलला. रंग कोणी बदलला? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये ठामपणे उभे आहोत. पळून कोण गेलं? बापाच्या पाठीत खंजीर खुपसला. वेळ पडली तर माझ्या गाडीच्या डिक्कीत सगळं पडलं आहे. माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला लागू नका. गद्दार शिंदे गट आणि गद्दार राष्ट्रवादी गट यांनी देखील नादाला लागू नये. तुम्ही तिकडे सुखी आहात ना, भांडी घासत आहात ना, बूट पॉलिश करत आहात ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चाटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुके आणि हापापलेलो नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
























