छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते :संजय राऊत
अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे आळवावरचे पाणी आहे. हे पक्ष पवासाळ्यातल्या बेडकाप्रमाणे आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawa) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. छगन भुजबळ हे नाराज असून लवकरच ते अजित पवारांची साथ सोडणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार (Shiv Sena) असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी छगन भुजबळांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. भुजबळ आमच्यासोबत असते तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा टीळा लावला असता असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे आहेत. आतापर्यंत ज्यांनी शिवसेना सोडली ते कधीच स्वस्थ राहू शकत नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे सगळे अस्वस्थ आहेत. छगन भुजबळ जर आज शिवसेनेत असते तर एव्हाना मुख्यमंत्र्याचा टिळा लावून बाहेर पडले असते. जे अस्वस्थ आहेत ते आळवावरचे पाणी आहे.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे आळवावरचे पाणी : संजय राऊत
अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे आळवावरचे पाणी आहे. हे पक्ष पवासाळ्यातल्या बेडकाप्रमाणे आहे. पावसळ्यात जसा बेडूक डराव डराव करतो तसा त्यांचा पावसाळा सुरू आहे. पावसाळा गेला बेडूक आणि गांडूळ जसा नष्ट होतो त्याप्रकारचे हे पक्ष आहेत. पावसळ्यात जशा छत्र्या उगवतात त्या नष्ट होता. त्याप्रमाणे ते पक्ष देखील नष्ट होतील, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना निवडणुकीत मत नाही : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार जिंकले ते भाजपमुळे जिंकले आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना निवडणुकीत मत नाही. जी लोक जिंकली ती भाजपाची मत आहेत. एकनाथ शिंदेंचे गणित स्पष्ट होते की, तीन ते चार लाख मत विकत घ्यायची आणि मग भाजपाची मत तर होती. शिवसेना ही खरी उद्धव ठाकरेंची आणि तर खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या नेतृत्वाखालील आहे.
छगन भुजबळ यांनी शिवसेनेतच केले होते पहिलं बंड
छगन भुजबळ जर शिवसेनेत गेले तर तर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं बंडाचे एक वर्तुळ पूर्ण होईल. कारण साधारण 25-30 वर्षापूर्वी छगन भुजबळ यांनी शिवसेनेतच पहिलं बंड केलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते.
हे ही वाचा :