एक्स्प्लोर

Sanjay Raut Book Narkatla Swarg: अमित शाह घामाघूम, लहान जय शाहांना घेऊन मातोश्रीवर; बाळासाहेबांना म्हणाले, 'आप बात करेंगे तो न्यायमूर्ती...'

Sanjay Raut Book Narkatla Swarg: संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसं वाचवलं?, याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Sanjay Raut Book Narkatla Swarg: कारागृहात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लिहिलेलं 'नरकातला स्वर्ग' पुस्तक (Narkatla Swarg) एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. संजय राऊतांनी या पुस्तकांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना कसं वाचवलं?, याबाबत खळबळजनक दावा केला आहे. तसेच या पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केल्याचा दावाही करण्यात आला आहे. अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शाहांची कशी मदत केली, याबाबत संजय राऊतांनी या पुस्तकात सांगितलं आहे.

काळी-पिवळी टॅक्सी पकडून अमित शाह मातोश्रीवर-

नरकातला स्वर्ग या पुस्तकात पुढे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेली मदत त्याची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली. संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता. परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिला. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली. अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली. अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांना मदत करता येत नव्हती. अमित शाह गुजरातमधून तडीपार होतेच. सीबीआयने फास आवळल्याने अमित शाह यांच्या  तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शाह यांना कोणीतरी सुचवले. एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शाह यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरचे मुख्य गेटवरच अमित शाह यांना अडवून ठेवण्यात आले. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. अमित शाह घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते. दुसऱ्या दिवशी अमित शाह पुन्हा एकदा मातोश्रीवर आले. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शाह हे मातोश्रीवर गेले. 

अमित शाह दर्दभरी कहानी सांगत म्हणाले, आप बात करेंगे तो...

गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहानी शिवसेनाप्रमुखांना सांगितले . "मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे..." अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर अमित शाह बाळासाहेब यांना म्हणाले." आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे...तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत" त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शाह यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांना फोनवरून बोलले आणि त्यांचे शेवटचे "तुम्ही कोणतेही पदावर बसलेले असा पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका"...बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शाह यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासतल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या. त्यामुळे त्यानंतर अमित शाहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्या जगाने पाहिलं आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते  निर्घृणपणेचं वागण्याची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केली. ईडी कोठडी संपून न्यायालय कोठडी म्हणजे आर्थर ऊर्जेच्या दिशेने जाताना संजय राऊत आणि हे सगळं आठवड्याचं  या पुस्तकात सांगितलं.

संबंधित बातमी:

Sanjay Raut Book Narkatla Swarg: बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाहांना कसं वाचवलं?; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget