Sanjay Mandlik: राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधलं होतं, कालबाह्य विषयांवर बोलू नका; मोदीजी आताच्या काळात विकास करतायत: संजय मंडलिक
Maharashtra Politics: इतिहासात रमण्यापेक्षा सध्याच्या वस्तुस्थितीवर बोला, पंतप्रधान मोदी हे आताच्या काळात विकास करत आहेत. प्रचंड विकासनिधी आल्याने कोल्हापूर विकासाच्या मार्गावर; संजय मंडलिकांचा दावा
कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये धरण बांधले होते. त्याचे श्रेय आताच्या लोकांनी घेण्याचा प्रयत्न करु नये. आताच्या काळात पंतप्रधान मोदी विकास करत आहेत, त्यावर बोलावे, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या कोल्हापूरमधील (Kolhapur Loksabha) वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी रविवारी सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. राजर्षी शाहू महाराजांनी पूर्वी करुन ठेवलेल्या विकासकामांचे श्रेय आताच्या राजकारण्यांनी घेण्याचा प्रयत्न करु नये, असा टोला मंडलिक यांनी सतेज पाटलांना लगावला.
संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले की, पूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी विकासाचे काम केले होते. तुम्ही तुमची विकासकामे जनतेला सांगा. मला असं बोलायचं आहे की, कालबाह्य विषयांवर बोलण्यापेक्षा आपण वस्तुस्थितीवर बोलुयात. राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधले होते. त्याचे श्रेय आताच्या लोकांनी घेऊ नये. इतिहासात रमण्यापेक्षा पंतप्रधान मोदीजींनी आताच्या काळात विकास केला आहे, राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी विकास केला आहे, त्यावर बोलावे. आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी प्रचंड विकासनिधी आणला आहे. त्यामुळे कोल्हापूर विकासाच्या मार्गावर जात आहे. हा विषय आम्ही लोकांसमोर मांडतोय. त्यामुळे इतरांनीही भविष्यात काय होणार, यावर बोलावे, असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले.
बोलताना एक शब्द चुकलो, पण मी अपमान केला नाही; संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही: वीरेंद्र मंडलिक
कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपकडून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांचे चिरंजवीर वीरेंद्र मंडलिक यांनीही थेट शाहू महाराजांवर निशाण साधला आहे. त्यांनी म्हटले की, छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एक ही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही. ते काम विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केले आहे, असे वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटले.
आणखी वाचा
संजय मंडलिक आता करवीर नगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सुद्धा थेट वारसदार नाहीत म्हणणार का?