Sangli Lok Sabha: सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी (Vishal Patil) अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज
विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस नेते नागपूरकडे (Nagpur) रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल केली . काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठत उमेदवारी दाखल केली. तर आज काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाले तर महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणा आहेत.
काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक आग्रही
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक देखील प्रचंड आग्रही आहेत. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले.
चंद्रहार पाटलांचा काँग्रेसवर निशाणा
चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते विशाल पाटलांनी विरोध केला आहे. विशाल पाटलांकडून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर उमेदवारीला काँग्रेसकडून होणारा विरोध बघून सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दाखली..तर शेतकऱ्याच्या मुलगा खासदार होतोय हे दुखणं असेल तर काँग्रेसने तसं उघडपणे सांगावं असं चंद्रहार पाटील म्हणाले.
हे ही वाचा :