Sambhajiraje Chhatrapati : मनोज जरागेंना तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु, त्यासाठीच भेटलो होतो : संभाजीराजे छत्रपती
Sambhajiraje Chhatrapati : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना तिसऱ्या आघाडी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
Sambhajiraje Chhatrapati, धाराशिव : तिसऱ्या आघाडीत मराठा नेते मनोज जरांगे यांनी यावं. त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली असल्याचं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलं आहे. ते धाराशिवमध्ये बोलत होते. सध्या सगळे प्रश्न बिकट आहेत. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं म्हणत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि.8) आज तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले ते पुढील दोन दिवस मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टीची पाहणी करणार आहेत.
मी छत्रपती शाहू महाराजांचा नातू, त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसा देण्याचा प्रयत्न करू
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, तसेच राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात कसे टिकते याबाबत ही मला शंका आहे. फार गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावर ही प्रश्न उपस्थित केला आहे. एवढेच नाही माझ्या हातात राज्य आल्यानंतर मी आरक्षणाचा गुंता सोडवतो. मी छत्रपती शाहू महाराजांचा नातू आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसा देण्याचा प्रयत्न करू शकतो, असंही संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपतींची बच्चू कडूंसोबतही चर्चा
तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी काही आठवड्यांपूर्वी अंतरवाली येथे मनोज जरांगेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रहारच्या बच्चू कडूंसोबतही चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांच्यासमवेत माझी चर्चा झाली, मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत आहे. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत, असे म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करुनही त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Manoj Jarange : मी राजगादीला मानतो हे उदयराजेंना माहितीये, बार्शी मराठ्यांचं घर घोंगडी बैठक होणार, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा तो सोपल बरा : मनोज जरांगे