(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्याच्या लसीकरणांमध्ये पाच कोटी हडपले, मुंबईत कुकरचा आणि बार्शीत 700 कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचे भाजपवर गंभीर आरोप
Rohit Pawar on BJP, जामखेड , अहमदनगर : "मुंबई (Mumbai) येथील कुकर घोटाळ्यावर बोलत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. कुकर घोटाळ्यासोबतच बार्शीत (Barshi) 700 कोटींचा घोटाळा आहे.
Rohit Pawar on BJP, जामखेड , अहमदनगर : "मुंबई (Mumbai) येथील कुकर घोटाळ्यावर बोलत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. कुकर घोटाळ्यासोबतच बार्शीत (Barshi) 700 कोटींचा घोटाळा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कुत्र्याच्या लसीकरणांमध्ये पाच कोटीचा घोटाळा केला आहे. आता आम्ही 'एमएसआयडीसी'चा 12000 कोटींचा घोटाळा बाहेर काढला आहे. ॲम्बुलन्समध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. हे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना लोक घरी बसतील", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलत असताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
ज्याप्रमाणे अजितदादांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला तसं कार्य करावं
रोहित पवार म्हणाले, राजकारण्यांनी राजकारणात येणं यात वावगं काही नाही. मात्र कष्ट करावे विचारांशी एकनिष्ठ राहावं हे खूप महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार राजकारणात येण्यासंबंधी अजित पवारांनी भाष्य केलं आहे. ज्याप्रमाणे अजितदादांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला तसं कार्य करावं असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
सगळ्या जागांची बेरीज केली तर 500 पेक्षा जागा जास्त लढवाव्या लागणार आहेत
महायुतीत इतके पक्ष आहेत आणि ते लढवणाऱ्या जागा इतक्या आहेत की सगळ्यांची बेरीज केली तर 500 पेक्षा जागा जास्त लढवाव्या लागणार आहेत. महायुतीमध्ये मित्र पक्षांकडून जास्त जागेची मागणी होत असताना ही मागणी पूर्ण होणार नाही. ज्या ठिकाणी महायुतीचे मत खाल्ली जातील अशा ठिकाणी उमेदवार उभे करण्यास सांगून भाजप आपला स्वार्थ साधेल, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
सरकार तीन महिने पैसे देतील आणि नंतर योजना बंद करतील : रोहित पवार
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारने आणल्याने विरोधकांना भीती बसले आहे असं म्हटलं होतं त्यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी कुठून येणार याची तरतूद न करता तुम्ही केवळ योजना जाहीर करता. योजना जाहीर केली तर ती पूर्णत्वास नेली पाहिजे हे सरकार तीन महिने पैसे देतील आणि नंतर योजना बंद करतील असेही रोहित पवार म्हणाले. मात्र महाविकास आघाडी सरकार आलं तर ही योजना मी बंद करणार नाही, उलट ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
जे स्वतः स्टंटमॅन आहेत, त्यांनी सरकारने काय करायचं हे सांगायला नको, लाडकी बहीण योजनेवरुन अमृता फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल