एक्स्प्लोर

Rohit Pawar: देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा विरोधी पक्षनेते असताना केलेल्या मागणीची रोहित पवारांनी करून दिली आठवण; म्हणाले, कर्जमाफीची हीच योग्य वेळ....

Rohit Pawar: मुख्यमंत्री महोदय २०२० मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि मा. अजितदादा २०२२ मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात ओलादुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, असं रोहित पवारांनी म्हटलंय.

पुणे: राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, जळगाव, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत (Heavy Rain) झाले असून आतापर्यंत पावसाने ५ जणांचा बळी घेतला आहे. मराठवाड्यातील तब्बल ७५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अडकलेल्या नागरिकांना बोटी व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. हवामान खात्याने पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील, तर शुक्रवारीनंतर त्यात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले असून आधी अवकाळी पाऊस आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी असं म्हटलं आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना (Ajit Pawar) ते विरोधी पक्षांमध्ये असताना केलेल्या त्यांच्याच जुन्या मागण्यांची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.

Rohit Pawar Social Media Post: काय म्हणालेत रोहित पवार?

आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, "मा. मुख्यमंत्री महोदय २०२० मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि मा. अजितदादा २०२२ मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आज त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. मा. #देवाभाऊ आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद तर मा. अजितदादा आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळं राज्यात थैमान घातलेल्या अस्मानी संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी १५-२० हजार कोटींची मदत केली तर काही फरक पडणार नाही, असं मी म्हणतो आणि आपणही विरोधी पक्षनेते असताना म्हणाला होतात. प्रसंगी कर्ज घ्या पण संकटात असलेल्या आमच्या शेतकऱ्याला वाचवा. त्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीत इतर सगळे विषय बाजूला सारून #ओला_दुष्काळ आणि #सरसकट_हेक्टरी_५०_हजार_मदत_जाहीर_करा.. तसंच #कर्जमाफीची हीच #योग्य_वेळ असल्याने याचीही आठवण ठेवा. 
राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आपल्या आजच्या निर्णयाकडे लागलेत", असंही  रोहित पवारांनी म्हटलं आहेत.

Rohit Pawar: आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय

दुसऱ्या एका पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलंय, "अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून #माणुसकी_धर्माला आणि #महाराष्ट्र_धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे. आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत #ओला_दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच #योग्य_वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती!", असं म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Embed widget