एक्स्प्लोर

सुप्रियाताई जिंकल्या, आता दादांविरोधात युगेंद्र पवार विधानसभेला उतरवणार का? रोहित पवारांचं रोखठोक उत्तर

Satara News : रोहित पवारांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना आता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार विधानसभेला उतरवणार का, यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) पराभव झाला. बारामतीच्या जनतेनं सुनेत्रा पवारांना नाकारत सुप्रिया सुळे यांना कौल दिला. अजित पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला. याआधी चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांचाही निवडणुकीत पराभव झाला होता. सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर आता अजितदादांविरोधात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना विधानसभेला उतरवणार का? अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांनी यावर रोखठोक उत्तर दिलं आहे.

युगेंद्र पवार विधानसभेला उतरणार?

महाराष्ट्रामध्ये लोकांच्या माध्यमातून आपल्या विचाराला यश मिळालं आहे. लोकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे विचार फक्त फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने ते विचार जपावे लागतात, ते पवार साहेबांनी जपलेले आहेत. तत्व हे चव्हाण साहेबांसाठी महत्त्वाचे होते. पवार साहेब ते जपत आहेत. रोहित पवारांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही

भाजपने परिवार फोडला, पक्ष फोडला. त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात चालेल, त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही. महाराष्ट्रातील लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही. आत्मक्लेष करण्यासाठी अजितदादा येतील का नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. जेव्हा अडचण असतात, तेव्हा इथे येणे, हे महत्त्वाचं असतं. यश मिळतं, तेव्हा देखील इथे येणं महत्त्वाचं असतं. 

बच्चा बडा हो गया है

बच्चा म्हणून जे आम्हाला हिणवलं होतं, ते लोकांनी आम्हाला काल पाठिंबा देऊन दाखवून दिलं. आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो. युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. बच्चा बडा हो गया है, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. साताऱ्यातील उमेदवार हरल्यानंतर रोहित पवारांनी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे असं म्हटलं आहे. नेत्यांमुळे मतदान होत नसतं, लोकांमुळे मतदान होतं, हे काल लोकांनी दाखवून दिलं. उदयनराजे जिंकले, व्यक्तिगतरित्या आम्ही त्यांना व्यक्ती म्हणून शुभेच्छा देतो. पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देत नाही. ज्या पक्षाने पुरोगामी महाराष्ट्राला पाण्यात बघण्याचं काम केलं, त्यांच्याबरोबर ते असल्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा देत नाही. भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी साताऱ्यात ताकद लावली होती. पैशासोबत नेत्याने देखील ताकद लावलेले होते, असं रोहित पवार म्हणाले.

व्यक्तीपेक्षा विचार जिंकला हे आमच्यासाठी महत्त्वाचं

पार्थ पवारनंतर सुमित्रा पवार देखील हरल्या यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया देत म्हटलं की, विचारांची हार झाली, हे जास्त महत्त्वाचे आहे. भाजपने जो प्रयत्न केला होता, पुरोगामी विचार पायाखाली तुडवून, तो जनतेने आणून पाडला आहे. व्यक्ती हरला का जिंकला, यापेक्षा याच्यापेक्षा विचार जिंकला हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

18 ते 19 आमदार पक्षप्रमुखांच्या संपर्कात

अजित पवार गटाचे आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. रोहित पवार म्हणाले की, 18 ते 19 आमदार पक्षप्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काय आम्हाला कळालेलं आहे. 12 आमदार हे अजितदादा गटाचे भाजपच्या संपर्कात आहेत. ते 12 आमदार काय करतील ते पुढच्या काही दिवसात समजेल. 18 ते 19 आमदारांपैकी कोणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं, हे आमचे पक्षप्रमुख ठरवतील. ज्यांनी अडचणीच्या काळात मदत केली, त्यांना पहिलं प्राधान्य दिले जाईल. 

कुणाला तिकीट द्यायचं, हे साहेब ठरवतील

योगेंद्र पवार पुढचे आमदार असतील का यावर रोहित पवार म्हणाले की, तिकीट कोणाला, कसं द्यायचं, हे साहेब ठरवतात. साहेबांना याबाबत विचारावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते पश्चिम महाराष्ट्रातील योग्य निर्णय घेतील. येणाऱ्या काळात 200 च्या पुढे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले पाहायला मिळतील. त्याच्यात अनेक मेजॉरिटीने नवीन चेहरे पाहायला मिळतील, असं रोहित पवार म्हणाले.

बारामतीकरांनी भाजपच्या विचाराला नाकारलं

बारामतीकरांनी आत्याला निवडून दिलं आणि काकीला नाकारलं यावर रोहित पवार म्हणाले, बारामतीकरांनी आजपर्यंत विचाराला पाठिंबा दिला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना आजपर्यंत बारामतीकरांनी पाठिंबा दिला आणि भाजपच्या विचाराला नाकारलं आहे. भाजपकडून प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचा अवमान होत गेल्यामुळे त्यांना महाराष्ट्राने दाखवून दिला आहे. इथं निष्ठा, विचार महाराष्ट्र धर्माबरोबर जे कार्यकर्ते उभे राहिले, जे नेते राहिले साहेबांसारखे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश सामान्य लोकांनी दिले संघर्ष हा पसंत असतो हे महाराष्ट्र नेत्या देशाला दाखवून दिले आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget