Rohit Pawar : "आता जनता जनार्दनालाच मतपेटीतून निर्णय घ्यावा लागेल"; आमदार अपात्रता निकालानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
MLA Disqualification Case : शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. यावर रोहित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
![Rohit Pawar : rohit pawar reaction on shiv sena mla disqualification case rahul narvekar uddhav thackeray eknath shinde sharad pawar maharashtra marathi news Rohit Pawar :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/13/5790aec9cb56b276b260f6909591f6ac170244408086489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MLA Disqualification Case Rohit Pawar Reaction मुंबई : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा (MLA Disqualification Case) निकाल नुकताच जाहीर केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर शिंदे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अपेक्षित पण दुर्दैवी निकाल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जनता जनार्दनालाच निर्णय घ्यावा लागेल
रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलंय की, "आता कोणत्याही दबावाशिवाय आधी सर्वोच्च न्यायालयातूनच संविधानाच्या बाजूने खरा न्याय मिळेल आणि नंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनता जनार्दनालाच मतपेटीतून निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजूने
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांसमोर आल्यानंतर या ठिकाणीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटावर मात केल्याचं दिसलं. दोन्ही गटाचे आमदार अपात्र ठरले नसले तरीही शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा राहुल नार्वेकरांनी दिला.
राहुल नार्वेकर म्हणाले की, 21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते असं महत्वपूर्ण निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं. तर पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असा निर्णय नार्वेकरांनी दिला. या तीनही घटनांवरून असं लक्षात येतं की एकनाथ शिंदे यांनी बहुमताच्या आधारे तीनही कायदेशीर लढाईमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मात केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)