Rohit Pawar on Ajit Pawar : येत्या दोन-तीन महिन्यांत मला तुरुंगात टाकले जाईल; रोहित पवारांचे अजितदादांवर खळबळजनक आरोप
Rohit Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखानावर ईडीने जप्तीची कारवाई केली. त्यानंतर आता रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत.
Rohit Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखानावर ईडीने जप्तीची कारवाई केली. त्यानंतर आता रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत. "पक्ष चोरी केल्यानंतर माझ्यावरील कारवाईला सुरुवात झाली. ईडीची यामध्ये काहीही चूक नाही. मी त्यांना सहकार्य केलं आहे. आम्ही 22 फेब्रुवारी रोजी सर्व माहिती त्यांना दिली होती", असं रोहित पवार म्हणाले. ते पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
येत्या दोन-तीन महिन्यांत मला तुरुंगात टाकले जाईल
रोहित पवार म्हणाले, विधानसभेत देखील मला अनेकांनी सांगितलं की तू गप बस असं सांगितलं. मात्र, आम्ही या प्रकरणात कुठे ही घाबरत नाहीत. ज्यांचे नाव दोषी म्हणून आहे, त्यातील 70 टक्के नावं भाजप, शिवसेना अजित दादांकडे आहेत. एकावरही आत्तापर्यंत कारवाई केली नाही. मात्र आता, माझ्यावर केस आली मी लढणार आणि जिंकणारच आहे. पुढील 2-3 महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल, असे आरोप रोहित पवारांनी केले आहेत. मी संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस काढली गेली. निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून मला नोटीस दिली जातेय का? मला अडचणीत आण्याच्या प्रयत्न केला जातोय, असे सवालही रोहित पवार यांनी केले आहेत.
कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अजून आलेली नाही
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अजून आलेली नाही. राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारामती ऍग्रो कंपनीचा जिथे मी संचालक आहे. एका सिंबॉलिक जप्तीचे आदेश ईडीकडून देण्यात आलेत.
जप्तीची नोटीस आमच्याकडे पोहचली नाही. त्यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळाली. जप्ती म्हणजे संपूर्ण जप्ती नाही एक सिंबोलिक आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
कामगारांना सांगू इच्छितो घाबरुन जायची आवश्यकता नाही
अप्पासाहेब म्हणजे माझ्या आजोबांनी ही कंपनी तयार केली. नंतर वडिलांनी लक्ष दिले. कामगारांना सांगू इच्छितो घाबरून जायची आवश्यकता नाही. 2007 पासून मी लक्ष द्यायला सुरुवात केली. 8000 कर्मचारी आणि कामगार इथे काम करतात. राजकीय दृष्टीने कोणी बघत असेल तर तुम्ही लाखो लोकांच्या कुटुंबाशी खेळ करत आहात. 8 मार्च रोजी बारामती ऍग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस आली मुळात ही प्रेस नोट चुकीची आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या