एक्स्प्लोर

गेल्यावेळी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मराठा आंदोलकांच्या हातावर तुरी दिल्या; आताचा जीआर देखील फसवणुकीची पुनरावृत्ती? रोहित पवारांची सडकून टीका

Rohit Pawar :आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी दिला असताना, तेंव्हाच सरकारने कार्यवाही का केली नाही? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Rohit Pawar : मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेल्या जीआरमुळं (GR) मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णतः मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे. याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन. पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. मंत्रिमंडळ उपसमिती आधीही होती आणि आजही आहे. या समितीत मराठा नेत्यांसह गिरीश महाजन तर काल व्यासपीठावर जयकुमार गोरे हे ओबीसी नेतेसुद्धा होते, मग काल घेतलेला निर्णय सर्वमान्य होता, तर हाच निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही? दोन वर्षे मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यासाठी मुद्दामहून वाट पाहिली गेली का? या आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी दिला असताना, तेंव्हाच सरकारने कार्यवाही का केली नाही? न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रीय झाली? मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय झाली पाहिजे, ही सरकारचीच भूमिका होती का? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्य सरकारने काढलेल्या GR बाबत तज्ज्ञांची मतं बघितली तर न्या. संदीप शिंदे समिती जे काम करत होती, तेच काम जीआरमधून हैदराबाद गॅझेट या गोंडस नावाखाली होणार असल्याचं दिसून येतं. या जीआर संदर्भात अनेक शंका उपस्थित होत आहेत. त्यावर सरकार उत्तर देणार आहे की नाही? असा प्रश्न ही रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मराठा आंदोलकांच्या हातावर तुरी दिल्या

या GRची वैयक्तिक पातळीवरील दाखल्यासाठी वैधता प्रमाणपत्रांसाठी अमलबजावणी झाल्यावरच खरं काय ते कळेल. पण लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबईत मराठा आंदोलकांच्या हातावर तुरी दिल्या, तसंच आत्ताही जीआर मधील आश्वासनांची कालमर्यादा पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलकांची फसवणूक तर झाली नाही ना, हे देखील समोर यायला हवं? गेल्या वेळेस नवी मुंबईत झालेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती होणार नाही, ही सर्वसामान्य अपेक्षा आहे. असे हि रोहित पवार म्हणाले.

महाराष्ट्राला चाणक्यनीतीची नाही तर माणुसकीच्या आणि महाराष्ट्र धर्माची गरज

एकंदर बघता, या सरकारने केवळ दोन समाजात वाद निर्माण करुन सत्तेची पोळी भाजली, हे स्पष्ट झालं आहे. सरकारने गावगाड्यातील ओबीसी-मराठा समाजात वाद लावल्याबद्दल जनतेची माफी मागायलाच हवी. ऐनकेन करून सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरण करण्यापेक्षा यापुढे शेतकऱ्यांच्या, युवांच्या मध्यमवर्गीयासह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर काम करणं अपेक्षित आहे. तूर्तास ‘दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही’ हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती असली तरी महाराष्ट्राला अशा चाणक्यनीतीची नाही तर माणुसकीच्या नीतीची आणि महाराष्ट्र धर्माची गरज आहे, हे विसरता येणार नाही. असेही रोहित पवार म्हणाले.

आणखी वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तथं...: मनोज जरांगे
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Patil: पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात, मनोज जरांगे कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचणार?, मराठा आंदोलकांसाठी मार्ग सांगितला
पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात, मनोज जरांगे कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचणार?, मराठा आंदोलकांसाठी मार्ग सांगितला
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तथं...: मनोज जरांगे
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही : मनोज जरांगे
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
Embed widget