एक्स्प्लोर

भाजपकडून मनसेला लोकसभेच्या जागा देण्याच्या हालचाली; रामदास आठवले म्हणाले, "राज ठाकरेंवर विश्वास नाही"

Ramdas Athawale On Raj Thackeray: महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा पाहिजेत, शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्हाला युतीतून मिळणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 

Maharashtra Politics : मुंबई : महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला आज रिप्लब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हजेरी लावली होती. तत्पूर्वी त्यांनी महाड येथील विसावा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय गोष्टींचा उलघडा केला. यावेळी त्यांनी लोकसभा आणि मोदींच्या विकासकामांची चर्चा केली. महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा पाहिजेत, शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्हाला युतीतून मिळणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 

रामदास आठवले म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन बाबासाहेब आंबडेकर यांचं स्वप्न साकार केलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश विकासाकडे वाटचाल करतोय. देशातील नॅशनल हायवे सुसाट झालेत. नितीन गडकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची निर्मिती करत आहेत. 370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये मोदींच मोठं काम आहे. मोदी हे जगातील सर्वात मोठे नेते आहेत. विकासपुरुष म्हणून त्यांची आज ओळख आहे. 'सबका साथ, सबका विकास' या तत्वामुळेच रिपब्लिकन पार्टी मोदींसोबत आहे."  तसेच, "संविधान बदलणार ही निव्वळ अफवाच आहे. देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. येणाऱ्या निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. जनतेचा कौल पुन्हा मोदींच्या बाजूनंच असेल. महाराष्ट्रात आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत." 

राज ठाकरे अमित शहांना भेटून योग्य निर्णयाकडे वळलेत, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. तसेच, एकदिवस राहुल गांधींनासुद्धा एनडीएमध्ये यावं लागेल, असं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे महायुतीला आगामी निवडणुकीत हमखास 45 जागा मिळतील, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. 

आम्हाला दोन जागा मिळाव्यात, राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही : रामदास आठवले 

महाराष्ट्रात शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा लोकसभेसाठी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, अशी इच्छाही रामदास आठवलेंनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. शिर्डीची जागा दिली नाही तर बदल्यात अन्य काही देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असंही ते म्हणाले. आम्ही कितीही झालं, तरी इंडिया आघाडीत जाणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार सत्तेत विकास करण्यासाठी राहणं पसंत करू, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. आरपीआय पक्ष  छोटा असला तरी महाराष्ट्रात 2 जागा आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही. आमच्या युतीत राज ठाकरे येणे अनपेक्षित, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असं म्हणत आठवलेंनी थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget