Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा केली कमी, खासदार राजन विचारे यांची मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटातील नेत्यांची सुरक्षा कोणत्याही कारणाविना कमी करण्यात आली असून ती पूर्ववत करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका हायकोर्टात सादर करण्यात आली आहे.
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटातील नेत्यांची सुरक्षा कोणत्याही कारणाविना कमी करण्यात आली असून ती पूर्ववत करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका हायकोर्टात सादर करण्यात आली आहे. ठाण्यातील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका सादर केली आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्तांनाही प्रतिवादी करण्यात आले असून याचिकेवर येत्या 9 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : काय आहे याचिका
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारनं (Shinde-Fadnavis Government) ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा चुकीच्या आणि राजकीय हेतूनं कमी केल्याचा आरोप या फौजदारी याचिकेतून करण्यात आला आहे. राजन विचारे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. कोणत्याही काराणविना अचानकपणे ही सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे आपल्यासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटाच्या काही कार्यकर्त्यांना विनाकारण सुरक्षा पुरवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) विरोधकांना प्रचंड त्रास दिला जात आहे. या अराजकतेची व्याप्ती इतकी आहे की, खासदाराला घाबरवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असून शिंदे किंवा भाजपशी हातमिळवणी न केलेल्या खासदार आणि आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोपही विचारे यांनी याचिकेतून केला आहे. सध्या आपल्या सुरक्षिततेसाठी एकच पोलीस हवालदार तैनात आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा पुन्हा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे.
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : निर्भया पथकातील वाहने दिमतीला
निर्भया निधी अंतर्गत खरेदी केलेली पोलीस वाहनं ही सध्या शिंदे गटातील आमदार आणि खासदारांच्या दिमतीला असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. महिला सुरक्षेसाठी खरेदी केलेली ही वाहने पथकाकडे परत केली जावीत अशी मागणीही केली आहे. या वर्षी जूनमध्ये, शहर पोलीस दलाने महिला सुरक्षेसाठी निर्भया निधी अंतर्गत मिळालेल्या 30 कोटींच्या निधीतून 220 बोलेरो, 35 इर्टिगा, 313 पल्सर मोटारसायकल आणि 200 अॅक्टिव्हा दुचाकी खरेदी केल्या होत्या.