एक्स्प्लोर

Raj Thackeray Pune MNS: पुणे महापालिकेत शून्य जागा, दारूण पराभव झालेल्या मनसेत मोठी उलथापालथ होणार; राज ठाकरे भाकरी फिरवणार

Raj Thackeray Pune MNS: पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Pune MNS: पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Election 2026) झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकेकाळी पुणे महापालिकेत तब्बल 29 नगरसेवकांचा दबदबा असलेल्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आणता न आल्याने पक्षात आत्मचिंतन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे शहर कार्यकारणीत मोठे बदल होण्याचे स्पष्ट संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.

मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी प्रतिक्रिया देताना, “निवडणुकांमध्ये जय-पराजय होत असतात. यंदा पुणे महापालिका निवडणुकीत आम्ही पहिल्यांदाच शिवसेनेसोबत युती करून मैदानात उतरलो होतो. निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. हा पराभव आम्ही मान्य केला असून लवकरच याबाबत पक्षांतर्गत आत्मचिंतन करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.

Raj Thackeray Pune MNS: प्रचार रणनीतीत कमी पडलो : हेमंत संभूस

निवडणूक प्रचाराबाबतही पक्षाकडून स्पष्ट कबुली देण्यात आली आहे. “या निवडणुकीत प्रचाराची रणनीती आखताना आम्ही काही ठिकाणी कमी पडलो. ही निवडणूक एकप्रकारे धनशक्ती विरुद्ध संघटनशक्ती अशी होती. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही जबाबदारी झटकतो,” असे सांगत संभूस यांनी येत्या काळात पुण्यात मनसेच्या कामकाजात बदल दिसतील, असा दावा केला.

Raj Thackeray Pune MNS: राज ठाकरे पुण्यात येणार 

महत्त्वाचं म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहितीही हेमंत संभूस यांनी दिली. “राज साहेब आणि शर्मिला वहिनी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुणे शहरात स्पष्ट बदल दिसतील. संघटनात्मक पातळीवर निर्णय घेतले जातील,” असे ते म्हणाले.

Raj Thackeray Pune MNS: शहराध्यक्षपदासह अनेक बदलांचे संकेत

पुणे मनसेच्या शहराध्यक्षपदाबाबत विचारले असता, “फक्त शहराध्यक्षपदाबाबत विचारू नका. येत्या काळात पक्षात अनेक बदल झालेले दिसतील,” असे सूचक विधान संभूस यांनी केले. त्यामुळे केवळ शहराध्यक्ष नव्हे, तर संपूर्ण शहर कार्यकारणीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरे पुण्यात ‘भाकरी फिरवत’ नव्या चेहऱ्यांना संधी देणार का, जुनी जबाबदारी बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raju Patil on Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे 'त्या' राजकारणाची शिसारी आली, केडीएमसीतील शिवसेना-मनसे युतीचे शिल्पकार राजू पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: मोठी बातमी: धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपकडून हायजॅक? भाजप आमदारानेच शिवसैनिकांना एबी फॉर्म वाटल्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget