शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात! आनंद दिघेंना आदरांजली, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण
Raj Thackeray in Anand Ashram : राज ठाकरे यांनी ठाणे येथील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला भेट दिली. तेथे त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.
![शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात! आनंद दिघेंना आदरांजली, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण Raj Thackeray visited Anand Dighe s Anand Ashram in Thane 19 years After he leave Shiv Sena There Raj Thackeray paid homage to the image of Anand Dighe Thane Kalyan Lok Sabha marathi news शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात! आनंद दिघेंना आदरांजली, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/12/9431de8a8915a00882fef44da26868f61715525620711322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झाले. राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तेथे त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. राज ठाकरे यांची श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.
19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात
राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचताच नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात पोहचले. यामुळे शिवसैनिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती.
राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी
राज ठाकरे हे ठाण्यामधून आधीपासूनच कार्यरत होते. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते, आनंद दिघे होते, तेव्हापासूनच राज ठाकरे ठाण्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही मनसे पक्षाच्या सभेला ठाण्यातून प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो. राज ठाकरे यांची कळवा येथे महायुतीच्या प्रचारार्थ सभा फार महत्त्वाची ठरणार आहे. या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेतील जनतेची मत महायुतीच्या पारड्यात पाडून श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना विजयी करण्यासाठी राज ठाकरे थेट ठाण्यात पोहोचले, त्याआधी ते आनंद आश्रमात पोहोचले.
राज ठाकरेंचं आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन
राज ठाकरे यांच्या रविवारी ठाण्यात भव्य सभा पार पडणार आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या (Anand Dighe) आनंद आश्रमाला भेट दिली आहे. शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघे यांच्या आश्रमात जाणार आहे. रविवारी कळव्यात राज ठाकरे यांची नरेश म्हस्केंच्या (Naresh Mhaske) प्रचारार्थ सभा होणार आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे (Raj Thackeray) आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आनंद आश्रमात पोहोचले आहे.
पाहा व्हिडीओ : सभेपूर्वी राज ठाकरे आनंद आश्रमात, आनंद दिघेंच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)