Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: उद्धव ठाकरेंचं ते एक वाक्य अन् राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे खळखळून हसल्या
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: ठाकरे बंधूंनी यावेळी त्रिभाषा सूत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. वरळी डोममध्ये एकवटलेले शिवसैनिकांचे आणि मनसैनिकांचे कान ज्यासाठी आतुरले होते, ती घोषणा अखेर उद्धव ठाकरेंनी केली. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यात केली आणि वरळी डोममधल्या हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
ठाकरे बंधूंनी यावेळी त्रिभाषा सूत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदेंनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यातून प्रहार केला. उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. गद्दार कायम झुकलेलेच असतात, उठेगा नही साला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंसह (Sharmila Thackeray) सर्वजण खळखळून हसताना दिसून आले. दरम्यान, वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसतं तर कुठे असता?, मधल्या काळात यांनी सुरू केळं होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर-
उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. तीन वर्षांपूर्वी उठाव केला. त्यावेळी दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता. त्यावेळी ते आडवे झाले. त्यातून सावरले नाहीत. आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उठण्याची भाषा त्यांनी करू नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने मात्र सत्तेची मळमळ बोलून दाखवली. कोणत्याही पक्षाचा झेंडा आणि अजेंडा नको असं ठरलं होतं. ते फक्त एकाने पाळलं. दुसऱ्याने मात्र स्वार्थाचा अजेंडा राबवला असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला.
























