Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : रश्मी आणि शर्मिला ठाकरे, आदित्य आणि अमित ठाकरे; सर्वजण एकत्र दिसणार, बसण्याची जागाही ठरली!
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा आज शनिवारी (दि. 5) मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा भव्य विजयी मेळावा शनिवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली असून, मराठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे. 'आवाज मराठीचा! या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंनी जनतेला विजयी मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे.
आता या मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे. तर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्रच दिसणार आहेत. ठाकरेंचे कुटुंब व्यासपीठासमोर पहिल्या रांगेत बसतील, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, व्यासपीठावर केवळ ठाकरे बंधू असणार आहेत. ठाकरे बंधूंची एन्ट्री सुद्धा ग्रँड होणार आहे. तसेच मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. (जर कांग्रेसचे नेते आले तर त्यांना भाषण दिलं जाईल, अशी शक्यता आहे.) शेवटी समारोपाचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असेल. यावेळी वरळी डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये विजयी गुढी उभारली
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी नाशिकहून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये विजयी गुढी उभारली आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने आता दोघांची राजकीय दिलजमाईही व्हावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी विजयी गुढी उभारत व्यक्त केली आहे. तर येवल्यातून मनसे सैनिक तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून "आले रे ..आले ..महाराष्ट्राचे वाघ आले, मराठी भाषेचा विजय असो, अशा घोषणा देत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो मनसैनिक व शिवसैनिकांचा ताफा येवल्यातून मुंबईच्या दिशेकडे रवाना झाला आहे.
आणखी वाचा























