एक्स्प्लोर

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईत ठाकरे बंधू 'मराठी मुस्लिम' फॅक्टरवर लक्ष केंद्रीत करणार; उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची विशेष रणनीती

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईत ठाकरे बंधू 'मराठी मुस्लिम' फॅक्टरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: मुंबईत ठाकरे बंधू 'मराठी मुस्लिम' फॅक्टरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मराठी आणि मुस्लिम मतदार आपल्या बाजूने राहावे, यासाठी ठाकरे बंधूंकडून रणनीती ठरवण्यात येणार आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray BMC Election 2025)

मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड्स पैकी 41 मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. तर जवळपास 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा आहे. त्यामुळे 227 पैकी या 113 वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंचे विशेष लक्ष असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मराठी मुस्लिम मतदारांच्या कॉम्बिनेशनवर विशेष लक्ष असेल. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते जागावाटपाचं सूत्र ठरवत असताना मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार-(Raj Thackeray-Uddhav Thackeray)

लोकसभा आणि विधानसभेला मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला माहिम, गोवंडी, मानखुर्द, वांद्रे पूर्व, भायखळा या भागात मुस्लिम फॅक्टरचा मोठा पाठिंबा मिळाला होता. तो मुस्लिम मतदारसोबतच आपला मूळ मराठी मतदार आपल्यासोबत राहावा यासाठी रणनीती ठरवली जात आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा मनसे पक्षसुद्धा मराठी मतदार ज्या ठिकाणी अधिक आहेत. त्या ठिकाणी आपल्या मराठी मतदाराला सोबत ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील. मात्र ही सगळी चर्चा सुरू असताना अजूनही माहीम, दादर, विक्रोळी, भांडुप, लालबाग, वरळी या भागातील प्रभाग आपल्याकडे अधिकाधिक राहावे यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह आहे आणि तिथे तिढा कायम असल्याचं कळतंय. या जागांवर एकमत करण्यासाठी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.

मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख मतदार- (BMC Election 2026)

मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी, मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख मतदार असून त्यापैकी 53 टक्के पुरुष मतदार तर 47 टक्के स्त्री मतदार आहेयातील सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील प्रभागात असून कमी मतदार सायन कोळीवाडा परिसरातील प्रभागात आहेत. सर्वात जास्त मतदार चांदिवलीतील प्रभाग क्रमांक 164 मध्ये तर सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा मधील प्रभाग क्रमांक 176 मध्ये आहे. तर सर्वाधिक महिला मतदार बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget