एक्स्प्लोर

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असताना देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरेंची भेट; शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक एक तासभर बैठक झाली. 

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव, टाळ्या, हाळ्या एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक एक तासभर बैठक झाली. 

सकाळी 10.35 ते 11.35 एवढा संपूर्ण तासभर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली. आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा रंगात आली होती. मात्र युतीचा प्रस्ताव पहिले कोण पाठवणार यावरही एकीकडे नाट्य रंगलं होतं. मात्र त्याआधी अचानक ही गुप्त भेट या दोन नेत्यांमध्येही झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी या गुप्तभेटीद्वारे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिल्याचं मानलं जातंय. 

फडणवीस-राज भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते काय काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीतील तपशील अजून बाहेर आलेला नाही.  आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं.  मनसेसोबत जाण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत आणि तसं उद्धव ठाकरे यांनी आधी स्पष्ट केलं आहे.  देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. मात्र भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती आलेली नाही. राज ठाकरे यांना महायुतीमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न भाजपा करत असेल, तर यावर मी काय बोलू शकत नाही. मी माझ्या पक्षाबद्दल बोलेल. आमची सगळ्यांची इच्छा आहे की मनसेसोबत युती व्हावी, असं उदय सामंत म्हणाले. 

ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट कोणत्या विषयावर आहे, यावर लगेच भाष्य करणं चुकीचं ठरेल. राज ठाकरेंनी पहिली साद घातली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सगळी भांडणं मिटवायला तयार असल्याचं सांगितलं. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील मनसे-ठाकरे गटाच्या युतीसाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या भेटीवर लगेच भाष्य करणं चुकीचं ठरेल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीची टाईमलाईन-

सकाळी 9.40 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये....

सकाळी 10.35 - मुख्यमंत्री फडणवीस ताज लँड्स एंडमध्ये दाखल...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नसतानाही बैठक अचानक ठरली.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा असतानाच अचानक राज आणि फडणवीसांची भेट...

सकाळी 11.35 - मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमधून निघाले.

सकाळी 11.55- राज ठाकरे हॉटेलमधून निघाले.

संबंधित बातमी:

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, मात्र देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला, राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Maharashtra Weather Update: 15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter Data Row: दुबार मतदारांमुळे भाजपचा पराभव? शेलारांचा गंभीर आरोप
Voter Scam : दुबार मतदारांवरून भाजप आक्रमक, ठाकरे-गायकवाडांवर गंभीर आरोप
Ashish Shelar Vote Jihad: दुबार मतदारांमुळे MVA जिंकली? भाजपचा गंभीर आरोप
Ashish Shelar Voter List Scam: महायुतीचा गंभीर आरोप, लोकसभेत मतचोरी झाली?
Ashish Shekar Vote Jihad: ‘वोट जिहाद’चे समर्थक बनू नका, राज ठाकरेंना थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
शाब्बास रे पठ्ठे! अकोल्याच्या मामा-भाच्याची कमाल.. एकाचवेळी दोघेही झाले क्लास-वन अधिकारी, गावात एकच जल्लोष
Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Maharashtra Weather Update: 15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
Phaltan Doctor Death:  फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
Pune Crime Ganesh Kale: गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?
गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?
Shankaracharya Swami pragyanand Saraswati : जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
Shiney Ahuja Photo Viral: बॉलिवूडच्या हँडसम हंकला ओळखता? 7 वर्षांच्या तुरुंगवासामुळे करिअरला लागला ब्रेक, सध्या काय करतोय 'हा' अभिनेता?
बॉलिवूडच्या हँडसम हंकला ओळखता? 7 वर्षांच्या तुरुंगवासामुळे करिअरला लागला ब्रेक, सध्या काय करतोय 'हा' अभिनेता?
Embed widget