एक्स्प्लोर
Ashish Shekar Vote Jihad: ‘वोट जिहाद’चे समर्थक बनू नका, राज ठाकरेंना थेट इशारा
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर 'वोट जिहाद'च्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. 'हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव-बडव-बडवा, पण मुस्लिम दुबार मतदार असेल, तर तो तुमचा कडवा', असे म्हणत शेलार यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'वोट जिहाद'ला पाठिंबा देऊ नका, असा थेट इशारा त्यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे. महाविकास आघाडीने घोटाळा दाखवण्याचं आव्हान दिलं होतं, त्याला उत्तर देताना शेलार यांनी दुबार मतदारांचा मुद्दाच एक घोटाळा असल्याचं म्हटलं आणि त्याचे पुरावे देण्यास तयार असल्याचंही सांगितलं. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी बोट ठेवले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















