एक्स्प्लोर

Raj Thackeray : मराठा आंदोलकांचे प्रश्न अन् राज ठाकरेंची उत्तरं, धाराशिवमध्ये समोरासमोर झालेल्या बैठकीतील प्रत्येक शब्द जशाचा तसा

Raj Thackeray and Maratha Protester, धाराशिव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यापूर्वी सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं.

Raj Thackeray and Maratha Protester, धाराशिव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यापूर्वी सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांना भेटीची वेळ मागितील. मात्र, आंदोलकांना वेळ नाकारण्यात आली. धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी  असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली. बराच वाद झाल्यानंतर शेवटी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये 10 मिनीटे चर्चा झाली. 

मराठा आंदोलकांनी कोणते प्रश्न विचारले?

तुम्ही आरक्षणाबाबत आज वक्तव्य केलं. मात्र आत्तापर्यंत आरक्षणासाठी आमचे 400 बांधव याच्यामध्ये मयत झाले. आण्णासाहेब पाटलांपासून आत्तापर्यंत अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. आम्हाला कोण भडकवतं नाही. आज आमचा समाज कोणत्या अवस्थेत जगतोय आम्हाला माहिती आहे, अशा परिस्थितीत तुम्ही माथी भडकवली जातात, किंवा आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य करणे चुकीचे होते. आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात? तुम्ही सध्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार आहात? 

राज ठाकरेंनी दिलेली उत्तरं सविस्तर... 

राज ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यावेळी मी तिथे आलो होतो. मी त्यांना सांगितलं. तुम्ही जी मागणी करत आहात. ती पूर्ण होणार नाही. हे लोक होऊ देणार नाहीत. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. संघर्ष घडवून मतं मिळवणे एवढेच पाहिजे. तुम्ही नंतर वाऱ्यावर गेलात तरी चालेल, असं आहे. हे राज्य माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही. आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी याचावर पैसा खर्च व्हायला हवा. तो नको त्या गोष्टीवर चर्चा केला जातो. पूल बांधले जातायत. ते कोणासाठी बांधतात? कोण लोकसंख्या वाढवतं महाराष्ट्रात? जे पैसे महाराष्ट्रावर आणि तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत. ते फक्त चार शहरांमध्ये खर्च होत आहेत. शहरातील लोकसंख्या वाढीमुळे पैसा तिथेच खर्च होतो. जो तुमच्यासाठी खर्च व्हायला हवा. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांना नोकरीसाठी घेणार नाही, असं म्हणतात. शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत हेच माहिती नसते. आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे आपल्या मुलांना माहिती नाही. नोकऱ्या महाराष्ट्रात असतात आणि जाहिराती युपी आणि बिहारमध्ये असतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सर्व अंदाज येईल. जरांगे पाटलांनाही सर्व अंदाज येतील. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आहे. इथल्या मुलांना शिक्षण आणि रोजगार याच्यासारख्या संधी कोठेच उपलब्द होणार नाहीत. महाराष्ट्रात सर्वकाही आहे, म्हणूनच बाहेरच्या राज्यातील लोक इथे येतात. तुमच्या तोंडाला पानं पुसतात आणि स्वार्थ साधतात त्यांच्यापासून सावध राहा.

बैठक पार पडल्यानंतर मराठा आंदोलक काय म्हणाले?

मराठा आंदोलक पत्रकारांशी बोलताना म्हणाले,  राज ठाकरे यांनी जरांगेची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करतो म्हणाले. त्यामुळे आम्ही तात्पुरते हे आंदोलन स्थगित करतोय. राज ठाकरेंच्या पुढच्या भूमिकेनंतर आम्ही आमची भूमिका ठरवू. मनसे समर्थक काही पेजेस वरून दोन कार्यकर्त्यांचे फोटो वायरल करत हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचे म्हटले जातेय. त्यावर देखील या कार्यकर्त्याने स्पष्टकरण दिलं असून आम्ही कुठल्याही पक्षाचे नाहीत,असं म्हटलंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

Manoj Jarange : आरक्षण कशासाठी लागतं हे माहिती नाही, आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
Gadchiroli: धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणारMaitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध :  02 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines  : सकाळी ८ च्या हेडलाईन्स :  02 February 2024 : ABP MajhaSanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
Gadchiroli: धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
Tax Regime: 12 लाखांच्या निर्णयानं नव्या कररचनेला अच्छे दिन, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला फायदेशीर, जाणून घ्या  
सगळीकडे नव्या कररचनेची जोरदार चर्चा, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला अजूनही फायदेशीर
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात 12 लाख करमुक्तीचा डाव खेळला, पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही! सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष, शिक्षणावरही हात आखडला
अर्थसंकल्पात 12 लाख करमुक्तीचा डाव खेळला, पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही! सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष, शिक्षणावरही हात आखडला
Dhananjay Deshmukh : नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर
नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : राज्यात जीबीएसने घेतला पाच जणांचा बळी; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बाधितांची सख्या दीडशेच्या घरात
राज्यात जीबीएसने घेतला पाच जणांचा बळी; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बाधितांची सख्या दीडशेच्या घरात
Embed widget