एक्स्प्लोर

Raj Thackeray: बाथरुममध्ये शिरल्यानंतर माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला; राज ठाकरेंचं मिश्किल भाषण, परदेशातील भन्नाट किस्से

Raj Thackeray: राज ठाकरेंनी आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेमधील किस्सा देखील सांगितला.

Raj Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेमधील किस्सा देखील सांगितला. गेले 20-25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतं. तिथे इंटरव्ह्यू झाला. तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला, त्याने आग्रह केला. मला म्हटलं तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलं. त्या हॉटेलमध्ये जाऊन मी खरच थक्क झालो. असंख्य लोक मला तिकडे भेटले, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

परदेशात इतकी जंगले आहेत..कॅनडा आणि अमेरिका यात पाच तलाव आहेत. तिथे देशभरात असंख्य तलाव आहेत. यूरोपातही आहेत. आकाशातून दिसणारे जे पाच तलाव आहेत. त्यात हे पाच तलाव आहे. किती मोठे आहेत हे पाहा. या पाच तलावातील टिंब तुम्ही गुगगलवर पाहा. तिथे टिंब दिसतो. तो नायगरा फॉल्स आहे. जगातील सर्वात मोठा धबधबा हा टिंबासारखा दिसतो. इतके तलाव इतक्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी असून ते कागदाने पुसतात. आणि आमच्याकडे पाऊस कधी पडणार, धरणं कधी भरणार. आपल्याकडे दुष्काळ पडेल असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचं मिश्किल भाषण, परदेशातील भन्नाट किस्से-

पाण्यापासून ते टॉयलेटपेपर पर्यंत जाणं सोपं नाही. मराठीत म्हण आहे, ज्याची जळते, त्यालाच कळते...परदेशात गेल्यावर सकाळ्या वेळेला खूप हालत होते, तुम्हालाही माहिती असेल. सर्व फिरून वैगरे मी हॉटेलमध्ये आलो आणि बाथरुममध्ये गेलो. बाथरुममध्ये शिरल्यानंतर माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला. तो जेटस्प्रेबघून आनंदाश्रू आवरेना त्याला, असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

विधानसभा निवडणुकीत कोणतीही युती नाही: राज ठाकरे

राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, हे पाहावे लागेल. तसेच मनसे सोडण्याच्या तयारी असलेल्या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी भाष्य केले. मी विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी बघत होतो. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. आपल्यातील काही लोकही जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

व्हिडीओ-

संबंधित बातमी:

Raj Thackeray: विधानसभेत कोणतीही युती नाही...; राज ठाकरेंची मोठी घोषणा, काय-काय म्हणाले?, पाहा 10 महत्वाचे मुद्दे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात
मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात
Nimrat Kaur: अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते..'
अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते...'
Maharashtra Vidhansabha election 2024: मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM :  27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHingoli Prakash Thorat :  हिंगोलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने काँग्रेस नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात
मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात
Nimrat Kaur: अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते..'
अभिषेकसोबत अफेअरच्या अफवांवर निम्रत कौरचं उत्तर, म्हणाली 'मी काहीही करू शकते...'
Maharashtra Vidhansabha election 2024: मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
Embed widget