Raj Thackeray: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय येताच राज ठाकरेंनी चार शब्दांतच संपवला विषय; म्हणाले, 'देशात मनमानी...'
Raj Thackeray on Nagarparishad Election Result: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितलं आहे, याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Nagarparishad Election Result: आज राज्यभरात होत असलेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत (Nagarparishad Election Result) न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत (Nagarparishad Election Result) निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितलं आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Nagarparishad Election Result)
Raj Thackeray : राज ठाकरेंची प्रतिक्रिया
देशात मनमानी सुरु आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
राज्य निवडणूक आयोगाने हा प्रचंड मोठा घोळ घातला आहे. आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकले नाही. हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे. ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने घोळ घातला, त्याप्रमाणे आता त्यांनी पुढे जावे. आगामी निवडणुका मोठ्या आहेत. हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा. नाहीतर आम्ही प्रचार करायचा आणि निवडणूक आयोगाने एक पत्र काढून निवडणुका पुढे ढकलायच्या हे काही योग्य नाही.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, जवळपास 25 ते 30 वर्ष त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे, पण असं पहिल्यांदा घडतंय, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्यांचे निकाल पुढे चाललेले आहेत, मला असं वाटतं की एकूणच ही जी काही पद्धती आहे ही पद्धत फार योग्य वाटत नाही, अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सर्वांना मान्य करावे लागेल, निवडणूक आयोग देखील स्वायत्त आहे, पण यातून जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास झालेला आहे, आणि सिस्टीमच्या फेल्युअरमुळे त्यांची काही चूक नसताना अशा पद्धतीने काही गोष्टी होण्या योग्य नाहीत, मला वाटतं अजून फार निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुका मध्ये असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे, असेही पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
High Court Nagpur : न्यायाधीश नेमकं काय म्हणाले?
ज्या अर्थी एक्झिट पोल (Exit Poll) अखेरचे फेजचे मतदान संपेपर्यंत जाहीर केले जात नाही, कारण मतदानाचे सर्व फेज फ्री अँड फेयर (Free and Fair Election) राहिले पाहिजे, त्या अर्थी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा (Nagarparishad Election Result) 2 डिसेंबरचा टप्पा पार पडल्यानंतर, 20 डिसेंबरचे मतदान व्हायचे असताना, 3 डिसेंबरला मतमोजणी करून निकाल कसे घोषित करू शकता? असा सवाल करत राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
आपण याला एक निवडणूक म्हणून मानले पाहिजे. लोकसभेत 1 फेज झाल्यानंतर निकाल जाहीर करता की अखेरच्या फेजपर्यंत थांबता? मग इथे असे का? असा प्रश्नही न्यायालयाने केला आहे. उलट राज्य निवडणूक आयोगाने हे खुद्द करायला हवे होते.असेही निरीक्षण नागपूर खंडापीठाने नोंदवले आहे. परिणामी आता सर्व मतमोजणी 21डिसेंबरला घ्या. असा महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता एकत्रितरित्या मतमोजणी केली जाणार आहे.
























