एक्स्प्लोर

मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा, सभाही घेतल्या, पण शपथविधीलाच बोलावलं नाही; राज ठाकरेंनी बोलावली मनसेची तातडीची बैठक

MNS Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक बोलवली आहे. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

MNS Raj Thackeray Meeting: मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister Of India) पदाची शपथ घेतली आणि देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार (NDA Government) स्थापन करण्यात आलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं शपथविधी सोहळ्याला नसणं हे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलवली आहेत. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक बोलवली आहे. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा येथे मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभेतल्या कामकाजाचा आढावा आणि आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनं मनसेत नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच आता मनसे काही वेगळा निर्णय घेणार का? राज ठाकरेंचं पुढचं पाऊल काय असणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

विधानपरिषद निवडणुकीतही भाजपसाठी मनसे एक पाऊल मागे 

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. पण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मात्र, भाजपची भूमिका बदलल्याचा सूर मनसेमधून उमटतोय. लोकसभेनंतर मनसेनं विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार, अभिजीत पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारीनं अडचणी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भाजपनं राज ठाकरेंची मनधरणी केली. राज ठाकरेंनी भाजपच्या विनंतीचा मान राखून अभिजीत पानसेंची उमेदवारी मागे घेतली. 

लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा, राज ठाकरेंकडून प्रचार सभांचा धुरळा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलं. एवढंच नव्हे तर राज ठाकरे कणकवलीत नारायण राणे, पुण्यात मुरलीधर मोहोळ, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेयांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सभेच्या व्यासपीठावरही राज ठाकरे दिसून आले होते. या सभेत राज ठाकरे यांना प्रोटोकॉल डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाषण करुन देण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड स्तुतीसुमने उधळली होती.

पाहा व्हिडीओ : Raj Thackeray to Meet MNS Leaders : शपथविधीचं सन्मानपूर्वक आमंत्रण न मिळाल्यानं मनसेत अस्वस्थता!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Embed widget