एक्स्प्लोर

महाराष्ट्र अन् मराठीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय, महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार; संजय राऊतांची घोषणा

Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची खरी ताकद मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यात आहे. त्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.

Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance मुंबई: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मुंबई महानगरपालिकेची निवडणुका जिंकणार अशी घोषणा केली.  संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठं विधान केलं.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असं संजय राऊत म्हणाले. तसेच मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू, असं संजय राऊतांनी जाहीर केलं. महाराष्ट्र, मराठी एकजूटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. 

स्ट पतपेढीच्या निवडणुकीत अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र

मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी येत आले आहेत. या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना  आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. दोन बंधू एकत्र आल्यानंतर आता भाजपकडून सहकार पॅनलतर्फे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर उतरले आहेत. 

ठाणे महानगरपालिका दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची-

महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार का? या एका प्रश्नावर खमंग चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आंदोलनात आणि सामाजिक कार्यक्रमात एकत्र दिसून येत आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची खरी ताकद मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यात आहे. त्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी ही महापालिका काबीज करणे म्हणून पक्ष फोडीचा बदला घेण्यासारखे आहे. कारण याच महापालिकेपासून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती. आणि आजही त्यांचे या महापालिकेवर वर्चस्व आहे. दुसरीकडे मनसेने देखील या महापालिका क्षेत्रात असलेल्या महादरसंघात लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीत चांगली मते मिळवली आहेत. 2007 ला झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेचे 3 नगरसेवक निवडून आले होते. तर 2012 ला झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2017 मध्ये मनसेला भोपळा फोडता आला नाही. त्यावेळी एकही नागसेवक निवडणूक आला नाही. दुसरीकडे शिवसेनेचे 2007 मध्ये 48 नगरसेवक निवडून आले, 2012 मध्ये सेनेचे 53 नगरसेवक निवडून आले होते, तर 2017 मध्ये 67 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेच्या फुटी नंतर मात्र ठाण्यात ठाकरे गटाची ताकद अतिशय कमी झाली. 2017 च्या 67 नगरसेवकांपैकी फक्त 3 नगरसेवक सध्या ठाकरेंसोबत आहेत. इतर सर्व शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे जर या दोन्ही पक्षाची युती झालीच तर ठाण्यात दोन्ही पक्ष पुन्हा जिवंत करण्यासाठी बळ मिळेल.

संबंधित बातमी: 

BEST Employees Credit Society Election: ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मैदानात; 'बेस्ट' पतपेढी निवडणूक रंजक वळणावर!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget