एक्स्प्लोर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे हे रविवारी अनेक वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेले होते. ठाकरे गट-मनसे युती होण्याचे स्पष्ट संकेत

Raj Thackeray & Uddhav Thackeray: काल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा दोन बंधू (Thackeray Brothers) एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Bodies Election) जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीने त्यासाठी प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे बंधूंसाठी महायुतीने (Mahayuti) नो रिस्क धोरण अवलंबल्याची माहिती आहे. मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा ठाकरे बंधूंना फायदा होऊ नये, यासाठी महायुतीने विचारमंथन करुन रणनीती आखली आहे.

विधानसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता महायुतीला आव्हान असणार आहे महापालिका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे. त्यात मुंबई महापालिकेसह इतर काही महत्त्वाच्या महापालिकेवर विशेष लक्ष भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा असणार आहे. त्यात आता राज-उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि जर काही महापालिकांमध्ये विजयाची वाट जर खडतर होत असली तर त्यासाठी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार कळत महायुतीच्या नेत्यांनी प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता "नो रिस्क धोरण" ठाकरे बंधूंच्या संभाव्य युती संदर्भात अवलंबणार असल्याचे कळते.

5 जुलैच्या विजय मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे बंधुप्रेम हे ऑन स्क्रीन दिसत असताना भविष्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जर ही एकत्र आले तर तयारी महायुतीला करावी लागणार आहे. विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष असेल.

Thackeray Brothers: ठाकरे बंधूंची ताकद असलेल्या भागात महायुती काय करणार?

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची मुख्यत्वे करून एकत्रित ताकद  ही मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, नाशिक महापालिका, पुणे महापालिका याठिकाणी आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुका लढायच्या असतील तर मतांचे विभाजन होऊन ठाकरेंना त्याचा फायदा होऊ नये यासाठी महायुती म्हणून एकत्रित येऊन ठाकरे बंधूंना आव्हान देण्याचा विचार महायुतीतील नेते करत असल्याची माहिती आहे. 
 
याशिवाय, मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल. ज्याठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून महायुतीकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली जाईल. मुंबई पालिकेवर गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुती पोलखोल करण्यासोबतच मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीमधील वेगवेगळ्या आमदारांकडे दिली जाईल, असे समजते.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती  गोविंदा पथक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वापर करणार आहे. ठाकरे बंधूंची जर आगामी महापालिका निवडणुकांसाठी युती झाली तर मराठी मत एकवटण्यात किंवा मग आपल्या पारड्यात पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाईल. त्यामुळे याचा फटका महायुतीला बसू नये यासाठीची रणनीती महायुतीने आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करत दोन ठाकरे बंधूंची ताकद जिथे आहे तिथे त्यांना आव्हान देण्यासाठी एकत्रित येऊन लढण्याचा मार्ग महायुतीने अवलंबण्याचा विचार केला आहे. त्यामुळे जर हे झालं तर ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी थेट लढत मुंबईसह इतर काही महापालिकांमध्ये पाहायला मिळू शकते.

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या, पण भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

BJP on Nawab Malik : भाजपला राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांची 'अॅलर्जी' Special Report
Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget