Rahul Gandhi on Narendra Modi : पीएम मोदींच्या भाषेची गरिमा अन् भाजपच्या जागा दोन्ही घसरत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेची गरिमा आणि भाजपच्या जागा दोन्ही घसरत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींनी ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेची गरिमा आणि भाजपच्या जागा दोन्ही घसरत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींनी ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये पीएम मोदींनी राहुल गांधींसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा, नकली संतान असे शब्द वापरले आहेत. तर राहुल गांधींवर टीका करताना मोदींनी शहजादा हा शब्द वापरला होता.
प्रधानमंत्री की भाषा की गरिमा और भाजपा की सीटें - दोनों ही लगातार गिरती चली जा रही हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2024
उद्धव ठाकरेंचा नकली संतान म्हणून उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशमधील एका सभेत उद्धव ठाकरेंचा नकली संतान म्हणून उल्लेख केला होता. काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत, त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय की, यांनी म्हटलंय पश्चिम भारतातील लोक अरब वाटतात. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे? असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.
इच्छा पूर्ती न झालेली भटकती आत्मा इतरांचाही खेळ बिघडवते
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. इच्छा पूर्ती न झालेली भटकती आत्मा इतरांचाही खेळ बिघडवते. पुलोदच्या सरकारचा दाखला देत मोदींनी शरद पवारांवर अस्थिरतेचा खेळ सुरू केल्याचा आरोपही पीएम नरेंद्र मोदी यांनी केला होता.
देशवासियों!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2024
पहले पांच चरणों के मतदान में आपने झूठ, नफ़रत और दुष्प्रचार को नकार कर अपने जीवन से जुड़े ज़मीनी मुद्दों को प्राथमिकता दी है।
आज छठे चरण का मतदान है और आपका हर वोट सुनिश्चित करेगा कि:
- युवाओं के लिए 30 लाख खाली सरकारी पदों पर भर्ती और 1 लाख रुपए साल की पहली नौकरी… pic.twitter.com/TvcmqSwXj3
इतर महत्वाच्या बातम्या
Sonia Doohan : मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, सोनिया दुहान अजिदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर?