एक्स्प्लोर

Prakash Pawar : '... तर एकाच बाजूला घळघळीत बहुमत मिळेल', मनोज जरांगेंना किती यश? राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रकाश पवार यांचे बेधडक विश्लेषण

Prakash Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार यांनी बेधडक विश्लेषण केलं आहे.

Prakash Pawar on Maharashtra Vidhansabha Election : "प्रस्थापित मराठा हा शब्द बदनाम झालेला आहे. त्याला सहकाराशी संबंधित लोक म्हणता येईल. जे लोक सहकाराशी संबंधित होते, त्यांनी सहकारामार्फत अनेकांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे सहकारात असलेल्या नेत्याचे ते समर्थक झाले. ते मतदारांमध्ये 2014 पासून एक वेगळा समज निर्माण झालाय. भाजपचं 10 वर्ष सरकार आहे. त्यांचा फटका सहकाराला बसला आणि पर्यायाने त्यांच्या उपजिविकेला बसला असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे हे लोक माझा स्वाभिमान कुठे दुखवलाय हा विचार करत आहेत. माझे आर्थिक हितसंबंध कोणामुळे बिघडले? त्यामुळे हे लोक प्रस्थापितांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत. ते प्रस्थापितांमध्ये आपलं सुख किंवा भविष्य पाहतील, याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नेत्यांनाही कळून चुकलंय की आपण भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्याला मान सन्मान मिळाला नाही. आपला अवमान झाला का? यांचं उदाहरण म्हणून तुम्ही सोलापुरातील मोहिते पाटलांच्या घराणे पाहू शकता. असं होतं असेल तर हे फक्त सोलापूर पर्यंत मर्यादित नाही. मराठ्यांचं राजकारण हे पहिलं लक्षण आहे. राजकारणाशिवाय दुसर स्वत्व हे एक लक्षण आहे. यातून दोन टक्के मतदान शिफ्ट झालं तरी महाराष्ट्राचा पट बदलू शकतो आणि एकाच बाजूला घळघळीत बहुमत मिळू शकेल" असं विश्लेषण राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार (Prakash Pawar) यांनी व्यक्त केलं. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

नवबौद्धांचा आणि मुस्लिमांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने

प्रकाश पवार म्हणाले, महाराष्ट्राचं राजकारण 1991 पासून चार ते पाच गटांमध्ये विभागलं. त्याला बहुध्रुवीय राजकारण म्हणतात. आर्थिक सदनेतून जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. भाजप आणि शरद पवारांनी सेम टू सेम रचना तयार केली आहे. दोन्ही पक्षांकडे ओबीसी पण आहेत आण मराठा पण आहेत. कोमताही जिल्हा घेतला तर त्या जिल्ह्यात ही रचना पाहायला मिळेल. जे लोक म्हणतात की ओबीसींचं मतदान भाजपकडे जाईल आणि मराठ्यांचं वोटींग फुटेल म्हणतात. पण तसं काही होणार नाही. मतदानातून मराठाही फुटेल आणि ओबीसीही फुटेल. अस्सल लोकशाही म्हणतात. त्याप्रमाणे मतदानाचं एकत्रिकरण होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानात नवबौद्ध आणि मुस्लीम भर टाकतील. नवबौद्धांचा आणि मुस्लिमांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने फार कमी आहे. झुकता कल म्हणाले, तर आज महाविकास आघाडीकडे द्यावा लागेल, असंही प्रकाश पवार यांनी नमूद केलं. 

मनोज जरांगे पाटलांना किती यश मिळणार? 

पुढे बोलताना प्रकाश पवार म्हणाले, मनोज जरांगेंचं राजकारण आरक्षणावरचं पॉलिटिक्स आहे. आरक्षणाचं राजकारण टोटल महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार्ट आहे. परंतु तो गाभ्याचा पार्ट नाही. गाभ्याचा पार्ट हा आर्थिक हित संबंधांचा आहे. आर्थिक हितसंबंधांनंतर स्वाभिमानाचा विषय येतो. महाराष्ट्र हा प्रांत इतरांपेक्षा वेगळा आहे, तो स्वाभिमान घेऊन जगतोय. हे गाभ्याचे विषय आहेत. त्यानंतर विषय येतो. आरक्षण मिळायला पाहिजे. आरक्षणामुळे आपण प्रतिष्ठा तर गमावून बसणार नाही ना? अशाही मताचा एक वर्ग आहे. मनोज जरांगे पाटलांचे राजकारण काही प्रमाणात यशस्वी होईल. ठराविक मतदारसंघात यशस्वी होईल, पण ते निर्णायक पॉलिटिक्स नसेल. मनोज जरागेंचा फटका दोन्ही आघाड्यांना बसू शकतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही; त्यांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त झाले : एकनाथ शिंदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेल्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदनABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Embed widget