Video : बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण; सभेत थेट प्रकाश आंबेडकरांचा फोन, पाहा व्हिडिओ
मी अगोदरपासूनच गरीब मराठ्यांना समजावून सांगत होतो की, तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका, त्यामुळे दोघांमधील भांडण सुरू होईल.

पुणे : मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आजा बारामतीत जाऊन शरद पवार, अजित पवारांवर जोरदार टीका केली. तसेच, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ओबीसी समाजाला हा शासन आदेश मान्य नसल्याचे म्हटले. दरम्यान, बारामतीत हाकेचं भाषण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा त्यांना फोन आला होता. यावेळी, प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरुन येथील सभेला संबोधित केले.
फोनवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले
मी अगोदरपासूनच गरीब मराठ्यांना समजावून सांगत होतो की, तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका, त्यामुळे दोघांमधील भांडण सुरू होईल. ओबीसीच्या आरक्षणाचा ताट ओबीसींनाच राहिलं पाहिजे, मराठा समजाला आरक्षण पाहिजे असेत तर तु्म्ही वेगळं मागा, तरच ते टिकेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. यापूर्वी दोनवेळा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द केलं असून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, हेही स्पष्ट केलंय. माझी सर्व ओबीसी बांधवाना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे. आपण सत्तेत कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण सत्तेत आपल्या विचरांची माणसं बसवली तर आपलं ऐकलं जातं. सत्तेत आपल्या विचारांची माणसं बसली नाहीत, तर आजच्याप्रमाणे जबरदस्ती करण्यात येते. सरकारने आज जबरदस्ती करुन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ह्या जबरदस्तीने केलेल्या निर्णयाविरुद्ध आपल्याला लढावं लागणार आहे. मोर्चे, आंदोलनं करावे लागणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून आपल्याला आपलं आरक्षण वाचवाचयं आहे. आपण आपलं मत आरक्षणवाद्यालाच द्याल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी या ओबीसीच्या मोर्चातील सभेत फोनवरुन केली.
एका बाजुला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. हैदराबाद गॅझंट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेत्यांनी आंदोलक करण्याचा इशारा दिलाआहे. त्याचबरोबर आम्ही देखील मुंबई जाम करु असा सरकाराल इशारा दिला आहे. त्यामुळं राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी दौरे करत आहेत. आज लक्ष्मण हाके यांनी बारामतीत ओबीसी समाजाचा मोर्चा काढला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

























