'हे आरोप उद्धव ठाकरे, नाना पटोलेंकडे करायला हवे होते', विधान परिषदेतील विजयी आमदार प्रज्ञा सातवांनी फेटाळले अष्टीकरांचे आरोप
Nanded News: आमदार प्रज्ञा सातव यांनी नांदेड विमानतळावर काँग्रेस पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
Pradnya Satav: विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी नांदेड विमानतळावर काँग्रेस पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
यावेळी विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांसह पक्षातील अनेकांनी नव्याने आमदार झालेल्या प्रज्ञा सातव यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती.
प्रज्ञा सातवांनी फेटाळले अष्टीकरांचा आरोप
विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी विमानतळावरच हिंगोली चे खासदार नागेश पाटील अष्टेकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. लोकसभेमध्ये मी किती काम केले आहे हे उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही माहित आहे. नाना पटोले किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करायला हवी होती असं म्हणत नागेश पाटील आष्टीकर यांना रिमोट म्हणून ऑपरेट करत असल्याचा आरोप प्रज्ञा सातव यांनी केला.
काय केले होते अष्टीकरांनी आरोप?
हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी करत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही असा आरोप अष्टीकर यांनी केला होता. नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप प्रज्ञा सातव यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच विमानतळावर भेटण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. दरम्यान, आष्टीकरांच्या आरोपांवर विमानतळावरच त्यांनी हे भाष्य केले.
काँग्रेसची बळकटी वाढणार
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत (Vidhan Parishad election) आमदार प्रज्ञाताई सातव (Pradnyatai Satav) यांच्या विजयानं हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचं पारडं जड झालं आहे. विधनसभेच्या आमदारांमधून विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रज्ञाताई काँग्रेसच्या एकमेव आमदार ठरल्या असून काँग्रेसचे जिल्ह्यातील बळकटी वाढणार आहे.
हिंगोलीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांचे आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आता प्रज्ञाताईसातव यांच्या विजयाने काँग्रेसला जिल्ह्यात प्रतिनिधित्व मिळाले असून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढता आहे. त्यातच हिंगोलीत काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संघटन वाढीला वाव मिळणार आहे.
हेही वाचा: