Pradnya Satav : अखेर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर
Pradnya Satav, Candidate for Vidhan Parishad Election : काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे
Pradnya Satav, Candidate for Vidhan Parishad Election : काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना विधानपरिषदेची उमेदवारी (Vidhan Parishad Election) जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.
ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांचा उमेदवारीला विरोध
हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती. नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांचा दारुण पराभव केला होता. दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी लोकसभेत आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप आष्टीकर यांनी सातत्याने केला आहे.
2021 मध्ये देण्यात आली होती संधी
काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या उमेदवारीला पत्राद्वारे मंजूरी दिली होती. त्यांनंतर पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
भाजपकडून पंकजा मुंडेंना संधी
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) भाजपने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय सदाभाऊ खोत परिणय फुके यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Congress has announced Pradnya Rajeev Satav as its candidate for MLC elections in Maharashtra pic.twitter.com/t2Y2YRDfj7
— ANI (@ANI) July 1, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
Devendra Fadnavis on Pankaja Munde : केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...