अदानी प्रकरणात 'दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊ द्या...; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi On Adani Row: अदानी समूहावर झालेल्या फसवणुकीच्या आरोपांवरून विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या मुद्द्यावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला.
Rahul Gandhi On Adani Row: अदानी समूहावर झालेल्या फसवणुकीच्या आरोपांवरून विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर (central government) हल्लाबोल करत आहेत. या मुद्द्यावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला, त्यानंतर कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Rahul Gandhi On Adani Row: अदानी यांच्यामागे कोणाची ताकद आहे, हे देशाला कळायला हवे : राहुल गांधी
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी सांगितले की, "अदानी (adani group) मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे, ते घाबरले आहे. सरकारने चर्चा करावी. त्याला संसदेत परवानगी द्यावी. संसदेत यावर चर्चा व्हायला हवी, अदानी यांच्यामागे कोणाची ताकद आहे, हे देशाला कळायला हवे.''
Rahul Gandhi On Adani Row: 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या'
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, "आता मोदीजी (pm narendra modi) पूर्ण प्रयत्न करतील की अदानी यांच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये. याचे कारण आहे... कारण तुम्हाला माहीत आहे. मी हा मुद्दा 3-3 वर्षांपासून मांडत आहे. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या. लाखो कोटींच्या भ्रष्टाचारावर चर्चा व्हायला हवी.''
Rahul Gandhi On Adani Row: विरोधी पक्षांनी निदर्शने केली
काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर अदानी समूहावर झालेल्या आरोपांबाबत निदर्शने केली. विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती (Joint Parliamentary Committee) स्थापन करण्याची किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातच या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
दरम्यान, अदानी समूहाबाबत (Adani Group) अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालामुळे कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. या अहवालामुळे गेल्या सहा दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअरचे भाव सातत्याने पडत आहेत. यावरूनच आता विरोधी पक्ष आक्रमक झाले असून संसदेत या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी आंदोलन करत आहेत.
इतर महत्वाची बातमी: