एक्स्प्लोर

PM Modi : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकटात त्यांच्या मदतीला धावून जाईन, पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

PM Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून जाईन, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

PM Modi on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून जाईन, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. अडचणीत उद्धव ठाकरे यांना मदत करणारा मी पहिला असेन, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणात रश्मी वहिनींना रोज फोन करुन त्यांची विचारपूस केली, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं आहे.

...तर मी नेहमीच उद्धव ठाकरेंचा सन्मान

पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र. उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी वहिनींना फोन करुन नेहमी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी शस्रक्रिया करण्याआधीही मला फोन केला होता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की, आधी ऑपरेशन करुन घ्या, तब्येतीकडे लक्ष द्या. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून मी नेहमीच उद्धव ठाकरेंचा मान-सन्मान करेन. ते माझे शत्रू नाहीत. उद्या काही संकट आलं तर, त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

शिवसेना आणि घराणेशाही या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी रश्मी वहिनींना रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत, तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. माझी बाळासाहेबांना वाहिलेली ती श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणालो होतो की, मला उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्या दिल्या तरी, मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन, असं सांगत मोदींनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नयेABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 06 January 2025Vijay Wadettiwar :हत्या, आरोपी, पोलीस आणि चौकशीचा थरार;आरोपांनी गाजलेली वडेट्टीवारांची पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 06 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
Embed widget