एक्स्प्लोर

PM Modi Madha Malshiras Sabha: माढ्याचा पाणी प्रश्न,ऊसाचा दरावरून शरद पवारांवर हल्लाबोल ते राम मंदिर आणि काँग्रेसवर टीका; पंतप्रधानांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

PM Modi Madha Malshiras Sabha Highlights:  पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर काँग्रेसवर  हल्लाबोल केला. पंतप्रधानांच्या  भाषणातील महत्वाचे मुद्दे पाहूयात..  

PM Modi Madha Malshiras Sabha Highlights: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) माळशिरसमध्ये घणाघाती भाषण केले. माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha Election) उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar)   यांच्या प्रचारासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.  सोलापूर- धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारील मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आले होते.  या भाषणामध्ये माढ्याचा पाणी प्रश्न, ऊसाच्या दरावारुन शरद पवारांवर (Sharad Pawar)  निशाणा साधला आहे. 60 वर्षात जे काँग्रेसने केले नाही ते आम्ही दहा वर्षात केले हे  भर सभेत सांगितलं आहे.  पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर काँग्रेसवर  हल्लाबोल केला. पंतप्रधानांच्या  भाषणातील महत्वाचे मुद्दे पाहूयात..  

शरद पवारांचे नाव न घेता माढ्याच्या पाणी प्रश्नावर टीका (PM Modi On Sharad Pawar Madha Water Crisis)

15 वर्षीपूर्वी एक नेता लढण्यासाठी आला. त्यांनी दुष्कळावर मात करण्याची शपथ घेतली.  आता त्यांनी केलेल्या कामाची शिक्षा देण्याची वेळ आले आहे. माढ्याला पाणी देणार असे एका मोठ्या नेत्याने सांगितले होते.  मात्र आजही मराठवाडा, विदर्भ पाण्यासाठी वणवण फिरतआहे. त्या नेत्याने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्या नेत्याने महाराष्ट्रातील लोकांना धोका  दिला आहे. पाणी देणार असे सांगून मावळत्या सूर्याची शपख घेतली होती. आश्वासन पूर्ण न केल्याने आज त्या नेत्याची इथून लढण्याची हिंमत होत नाही,  असे म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 

ऊसाच्या प्रश्नावरून शरद पवारांवर टीका (PM Modi On Sharad Pawar Sugar Cane)

महाराष्ट्रातील मोठा नेता  कृषीमंत्री असताना ऊसाला भाव दिला  नाही, असे म्हणत पंतप्रधानांनी शरद पवारांवर हल्ला केला.  पंतप्रधान म्हणाले,   आमच्या काळात ऊसाचा एफआरपी प्रचंड वाढला. एफआरपी वाढावा म्हणून कधीच प्रयत्न केला नाही. मोठे नेते कृषीमंत्री असताना एफआरपी 200 रुपये होता आता आमच्या काळात 350 रुपये आहे.  इथलेच नेते कृषीमंत्री होते.इथल्या नेत्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या आयकर का माफ केला नाही? या नेत्याने कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न सोडवला नाही. इथले नेते फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात.  इथेनॉल उत्पादनाला आम्ही चालना दिली आहे. इथेनॉलमुळे 70 हजार कोटी जादा पैसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल (PM Modi On Congress)

काँग्रेसने 60 वर्षात जे केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केली आहे. शरिराचा कण कण, जीवनाचा क्षण क्षण देशाला समर्पित केले आहे. जनतेची प्रेम हीच आमची मोठी ताकद आहे. 60 वर्षात जे झालं नाही ते या सेवकाने केले आहे. 25 कोटी  लोकांना आम्ही गरिबीतून मुक्त केले आहे. 25 कोटी लोकांना गरीबीतून मुक्त करण्याचे सगळे पुण्य तुम्हला लाभणार आहे. त्या पुण्याचा खरा हकदार मी नाही तर तुम्ही आहे. काँग्रेस गेली 60 वर्षे फक्त गरिबी हटावचा नारा देत बसले. आज 80 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे. देशात  वेगाने विकासकाम सुरू केले आहे. 

सिंचनाची अनेक कामे आम्ही वेगाने पूर्ण  केली (PM Modi On Jal Yojna)

अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प आम्ही पूर्ण केला आहे. सिंचनाची अनेक कामे आम्ही वेगाने पूर्ण करत आहे. मी 10 वर्षात अनेक कामे केली आहेत.  महाराष्ट्रीयन लोक कामे न करणाऱ्या व्यक्तींचा बरोबर हिशोब ठेवते. महाराष्ट्र जनता प्रेमही करती आणि हिशोब बरोबर करते.   प्रत्येक शेतात आणि घरापर्यंत पाणी पोचवणे हर माझे मिशन आहे. पाच वर्षात 11 कोटी  घरात नळाचे पाणी दिले. अमृत सरोवर हे अमृत महोत्सवी वर्षात योजना सुरू केली.

शेतमालासाठी  पाच वर्षात सगळीकडे साठवणूक केंद्रे तयार करणार (PM Modi On Farmer)

सहकार क्षेत्रासाठी आम्ही नवीन मंत्रालय निर्माण केले आहे. विकासात सहकारी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशात पुढील पाच वर्षात सगळीकडे साठवणूक केंद्रे तयार करणार आहे. 

लाईट बील शून्यावर आणण्यासाठी सोलर योजना (PM Modi On Light Bill)

वीजबिले संपवण्यासाठी सोलर वापर योजना आणली आहे.   प्रत्येक घराचे लाईट बील शून्यावर आणायचे आहे हे माझे स्वप्न आहे.   एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत.

 तुमची संपत्ती लुटणारे सरकार तुम्हाला देशात हवं आहे का?  (PM Modi On Property)

  काँग्रेसचे सरकार तुम्हाला लुटणारे सरकार आहे.  तुमची संपत्ती तुमच्या मुला-बाळांना न देता तुमच्यकडून काढून घेऊन सरकारमध्ये जमा करायला सांगत आहे. तुमची संपत्ती लुटणारे सरकार तुम्हाला देशात हवं आहे का? असा सवला देखील पंतप्रधानांनी केला.

राम मंदिरांचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवलं (PM Modi On Ram Mandir)

राम मंदिरांचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवलं आहे. मताच्या राजकारणामुळे काँग्रेसने राम मंदिर बांधले नाही.  आम्ही राम मंदिक बांधून 500 वर्षाचे स्वप्न पूर्ण केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले 

भाषणाच्या सुरवातीला मागितली जनतेची माफी (PM Modi Apology  )

मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. छत्रपती शिवाजी महाराज , विठोबा रखुमाईला नतमस्तक होऊन भाषणाला सुरवात केली. सभेच्या सुरुवातीला त्यांनी जनतेची माफी मागितली. मी वेळेत सभा सुरु करतो. नेते उशीरा येत असल्याने जनतेला उशीरा येण्याची सवय लागली आहे. पण मी प्रत्येक सभेला वेळेत पोहचतो. त्यामुळे अनेका लोक उशीरा येत आहे. अजूनही लोक येत आहे, पण मी त्यांच्यासाठी न थांबता माझ्या भाषणाची सुरुवात करतो, असे म्हणत जनतेची माफी मागितली.

 रणजीत निंबाळकरांना मतदान करण्याचे आवाहन (PM Modi On  Ranjit Naik Nimbalkar) 

मतदान केल्याशिवाय चहापणी  करु नका. कितीही ऊन असले तरी मतदान जाऊन करा.  रणजीत निंबाळकरांना प्रचंड मतांनी विजयी करा,असे आवाहन मोदींनी केले आहे.   

PM Modi Speech :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget