एक्स्प्लोर

PM Modi Kerala Visit: 'भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Modi Slams Opposition In Kerala: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. कोची येथे भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

PM Modi Slams Opposition In Kerala: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. कोची येथे भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) कोचीच्या जनतेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार्‍यांना (Corrupt) वाचवण्यासाठी विरोधी पक्ष (Opposition Parties) एकत्र येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "विकास आणि तरुणांच्या आकांक्षांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असे मी 15 ऑगस्टला म्हटले होते. परंतु भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होत असताना देशाच्या राजकारणातही नवे ध्रुवीकरण सुरू झाल्याचे आपण पाहत आहोत. भ्रष्ट आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही राजकीय पक्ष उघड्यावर आले आहेत. संघटित होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून देशातील आणि केरळच्या जनतेला सतत सावध राहावे लागेल.''

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले, "आमचे सरकार देशातील प्रत्येक गरिबांना पक्की घरे देण्याची मोहीम राबवत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केरळमधील गरिबांसाठी सुमारे दोन लाख पक्की घरेही मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी एक लाख 30 हजारांहून अधिक घरे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. या मोहिमेचा केरळमधील तरुण आणि येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोठा फायदा होणार आहे. ते म्हणाले की, त्यांचे सरकार केरळच्या प्रत्येक गावात वेगवान इंटरनेटसाठी सतत काम करत आहे. ते म्हणाले, "केरळच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आले आहे. संपूर्ण देशात जिथे जिथे राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत, तिथे वेगाने विकास होत आहे.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बुधवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पाटणा येथे पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि महाआघाडीच्या इतर नेत्यांची भेट घेतली. मात्र नितीश यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर केसीआर यांनी वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता येथील जाहीर सभेतून विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच विरोधी पक्षांना एकत्र येण्यास आवाहन केले आहे. काँग्रेसने 2024 च्या रणनीतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, भाजपला केंद्रातील सत्तेतून काढून टाकण्यासाठी विरोधकांच्या एकत्रित मोहिमेत ते सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget