(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Lok Sabha constituency : पालघरमध्ये सेनेचा पत्ता कट, शिंदेंना दे धक्का, भाजपने जागा खेचली, हेमंत सावरा यांना उमेदवारी
Palghar Lok Sabha constituency : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Palghar Lok Sabha constituency : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलाय. शिंदेंच्या शिवसेनेचा विद्यमान खासदार असून देखील भाजपने ही जागा खेचून आणली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झालाय. हेमंत सावरा यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आग्रही होते. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरेंच्या भारती कामडींविरोधात सामना
हेमंत सावरा यांची लढत ठाकरे गटाच्या भारती कामडी यांच्याशी असणार आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यांच्या पक्षाचे 3 आमदार या मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची भूमिका लोकसभा निवडणुकीत महत्वाची असणार आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही त्यांना जागा खेचून आणता आलेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करत बाजी मारली आहे.
2019 मध्ये काय घडलं होतं?
शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारली होती. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा दारुण पराभव केला होता. राजेंद्र गावित यांना 5 लाख 80 हजार मतं मिळाली होती. तर बळीराम जाधव यांनी 4 लाख 91 हजार मतं मिळवली होती. त्यामुळे जवळपास 1 लाख 90 हजार मतांनी राजेंद्र गावित विजयी झाले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजेंद्र गावित शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या