'ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला
Omprakash Rajenimbalkar: आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ओमराजेंनी तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं.
!['ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला Omprakash Rajenimbalkar candidate of Mahayuti for Dharashiv Lok Sabha constituency, filed his nomination today. 'ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/3c088e5d458ad1d361e82c777e58177c1713259851745987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharashiv Lok Sabha Constituency: धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिवचे ओमदादा आणि फोनवाला खासदार म्हणून लोकप्रिय असलेल्या ओमराजे निंबाळकरांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक दिग्गजांनी धाराशिवला हजेरी लावली. आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ओमराजेंनी तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं.
मला अनेक ठिकाणांहून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी बोलावलं होतं. पण, मी सगळ्यांना सांगितलं, माझा ओमदादा अर्ज भरायला जातो, मला तिथेच जायला लागेल, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले. तसेच, महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, ओमदादा जिगर का तुकडा.. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांचा फॉर्म भरण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याचं सांगितले.यावेळी, आमदार रोहित पवार हेही व्यासपीठावर दिसून आले. त्यांनीही ओमराजे आणि आदित्य ठाकरेंचे हात उंचावत उपस्थितांना अभिवादन केलं. तर, आदित्य ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच माजी मंत्री अमित देशमुख यांचीही व्यासपीठावर एंट्री झाली. त्यावेळी, आदित्य ठाकरेंनी त्यांना जादू की झप्पी दिली.
शिंदेंवरही हल्लाबोल
आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार व राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नाहीत, शेतमालाला भाव नाही, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यामुळेच, धाराशिवची मशाल आपल्याला दिल्लीला पाठवायची आहे, असेही आदित्य यांनी म्हटले. यावेळी, नाव न घेता शिवसेना शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला.लोकसभेची ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे, ओमदादाही तिकडे जाऊ शकले असते, तेही गद्दारी करू शकले असते, त्यांच्यासोबत इंथ उपस्थित असलेले आमदार कैलास पाटील. या वाघाने तर मिंध्यांच्या गाडीतून उद्धव ठाकरेंना फोन केला, मिंध्यांच्या गाडीला लाथ मारुन ते परत आल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले.दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी खेकड्याची नांगी तोडून काढणारच, असे म्हणत पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावरही टीका केली.
तेरणा मेडीकल कॉलेजचं पोस्टमार्टम
धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनीही आपल्या भाषणातून माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी, त्यांनी नेरुळमधील त्यांच्या रुग्णालयातील गैरकारभाराचं पोस्टमार्टम केलं. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचा दाखला येत तेरणा हॉस्पीटलमध्ये बोगस रुग्ण दाखवून पैसे लाटण्यात आल्याची आकडेवारीच त्यांनी दिली. पद्मसिंह पाटलांच्या काळातील वैधकिय महाविद्यालय मुंबई लां मंजूर करून घेतले. तेरणा चॅरिटेबल मेडिकल कॉलेजमध्ये 16 रुग्णांवर 135 शस्त्रक्रिया केल्या. 2012 पासून 2020 पर्यंत तेरणा कॉलेजमध्ये शासनाचे 18 कोटी रुपये अनुदान लाटल्याचंही ओमराजेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)