मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या उरावर बसेन, शिंदे सरकारवर एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल
Eknath Khadse: विरोधक रोपज म्हणत आहे, काही ना काहीतरी होणार आहे, मात्र काही होणार नाही. मी तुमच्या उरावर बसणार आहे, या शब्दात एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Eknath Khadse: विरोधक रोपज म्हणत आहे, काही ना काहीतरी होणार आहे, मात्र काही होणार नाही. मी तुमच्या उरावर बसणार आहे, या शब्दात एकनाथ खडसे यांनी शिंदे (eknath shinde) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रे निमित्ताने सभा पार पडली. यावेळी एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.
विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काहीना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा यांचा प्रयत्न असून तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला, तरी मी सर्वांच्या उरावर बसेन, या शब्दात एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सरकारच्या आमदारांमध्ये जे अस्वस्थता आहे, ते बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावरून समोर आली आहे.
ज्यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे, त्या अपक्ष असो की इतर सर्व आमदार यांच्यात अस्वस्थता आहे. तीच अस्वस्थता आता हळू हळू बाहेर पडायला लागली आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि पुढे अजून काय होत ते पाहा, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
महाजन यांनी 1000 कोटींची कामे रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदार नाराज : एकनाथ खडसे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खडसे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष केलं होत. ते म्हणाले होते की, गिरीश महाजनांनी (girish mahajan) एक हजार कोटींचे काम रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराज आहे. ते म्हणाले होते, शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जसजसा उशीर होतोय, तसतशी अस्वस्थता वाढू लागली आहे. आता ही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत असून मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत.
इतर महत्वाची बातमी:
फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात, 30 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते उद्धाटन