2024 मध्ये पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार सशक्त उमेदवार असतील, तेजस्वी यादव यांचं मोठं वक्तव्य
Bihar Politics: बिहारचे उपमुख्यमंत्री यादव यांनी महाआघाडीचे सरकार परतल्यानंतर जंगलराज परतणार असल्याचा भाजपचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
Bihar Politics: राष्ट्रीय जनता दलचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी सांगितले की, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावर विरोधकांनी सहमती दर्शविली तर ते सशक्त उमेदवार असतील. अलीकडेच भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडून दुसऱ्यांदा आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील झालेल्या नितीश कुमार यांच्या तेजस्वी यादव म्हणाले की, त्यांना तळागाळात प्रचंड पाठिंबा मिळतो. जनता दल (युनायटेड), आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्र आल्यानंतर महाआघाडीची सत्ता येणे हे विरोधी ऐक्यासाठी शुभ संकेत असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
यादव यांनी पीटीआय-भाषाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बहुतेक विरोधी पक्षांना देशासमोरील मोठे आव्हान समजले आहे. यामध्ये भाजपचे वर्चस्व देखील सामील आहे. ज्यामध्ये ते पैसा, माध्यमे आणि प्रशासकीय यंत्रणांच्या जोरावर भारतीय समाजातून विविधता आणि राजकीय संवाद संपवण्याचे काम करत आहेत.
हा प्रादेशिक प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय आणि राज्य पातळीवरील विकासाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. यादव म्हणाले की, ''भाजप सहकारी संघराज्यावर बोलत असताना प्रादेशिक विषमतेकडे सतत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण केंद्राकडून आम्हाला काही मिळाले आहे का? तर याच उत्तर आहे काहीच नाही.''
जंगलराजवर तेजस्वी काय म्हणाले?
बिहारचे उपमुख्यमंत्री यादव यांनी महाआघाडीचे सरकार परतल्यानंतर जंगलराज परतणार असल्याचा भाजपचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, चर्चा आणि अनावश्यक गोंधळाचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे. विचलित करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या या युक्त्या लोकांना समजतात. हे सोशल मीडियाचे युग आहे, जेथे कशावर चर्चा व्हावी हे मुख्य प्रवाहातील माध्यम ठरवत नाही. यादव म्हणाले की, प्रादेशिक पक्ष आणि इतर पुरोगामी राजकीय गटांना त्यांच्या क्षुल्लक साधक-बाधक गोष्टींच्या पलीकडे जाऊन लोकशाहीला वाचवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
नितीश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का?
ते म्हणाले की, जर आपण लोकशाही आताच उध्वस्त होण्यापासून वाचवली नाही, तर पुढे ती वाचवणे आणखी कठीण होईल. 2024 च्या निवडणुकीसाठी नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यासाठी योग्य आहेत का आणि ते विरोधी पक्षाचे उमेदवार असू शकतात का, असे विचारले असता यादव म्हणाले, "मी हा प्रश्न नितीश कुमार यांच्यावर सोडतो. मी संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीने बोलण्याचा दावा करू शकत नाही. मात्र जर विचार केला तर नितीश कुमार हे नक्कीच एक मजबूत उमेदवार ठरू शकतात.