एक्स्प्लोर

Bihar Politics: नितीश कुमार भाजपच्या संपर्कात, बिहामध्ये पुन्हा एकत्र स्थापन करू शकतात सत्ता? प्रशांत किशोर यांचा दावा

Prashant Kishor Big Statement: बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलू शकतं. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या संपर्कात आहे, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor Big Statement: अलीकडेच नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. मात्र आता बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलू शकतं. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या संपर्कात आहे, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. याबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले आहेत की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संपर्कात आहेत. परिस्थिती बदलल्यास ते पुन्हा युती करू शकतात. मात्र नितीश कुमार यांचा पक्ष जनता दलने (यू) त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. प्रशांत किशोर हे दिशाभूल करून त्यांचा उद्देश राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा असल्याचं जेडीयूने म्हटले आहे. 

प्रशांत किशोर हे सध्या बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. सक्रिय राजकारणात येण्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांच्या या यात्रेकडे पाहिले जात आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की, नितीश कुमार यांनी खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यामार्फत भाजपशी संवादाचा मार्ग खुला ठेवला आहे. या संदर्भात हरिवंश यांना त्यांच्या प्रतिक्रियेसाठी पाठवलेल्या प्रश्नावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांच्या पक्षाने हा दावा फेटाळून लावला असून कुमार हे पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असं म्हटलं आहे.

संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी हा दावा केला: जेडीयू

प्रशांत किशोर यांच्या दाव्यावर जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी जाहीरपणे सांगितले आहे की ते आयुष्यात पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत. त्यागी म्हणाले, 'आम्ही त्यांच्या दाव्याचे खंडन करतो. नितीश कुमार 50 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. तर किशोर सहा महिन्यांपासून आहेत. किशोर यांनी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर रोजी पश्चिम चंपारण येथील भितिहारवा येथील गांधी आश्रमातून पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेत ते येत्या 12-15 महिन्यांत 3,500 किमीचा प्रवास करणार आहेत. प्रशांत किशोर हे जवळपास 18 महिने जेडीयूमध्ये होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. 

इतर महत्वाची बातमी: 

Mallikarjun Kharge : काँग्रेसमध्ये सगळे एकसमान; अध्यक्षपदाची निवडणूक जिकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget