'ना घर का ना घाट का' अशी अपक्षाची अवस्था, नितीन गडकरींचा वसंतदादांच्या नातवावर हल्लाबोल
Nitin Gadkari on Vishal Patil, Sangli : संजयकाका चिंता करू नका. कामच इतके आहे की,कुणावर टीका करायची गरज नाही.
Nitin Gadkari on Vishal Patil, Sangli : संजयकाका चिंता करू नका. कामच इतके आहे की,कुणावर टीका करायची गरज नाही. अपक्षांना तरी अजिबात मतदान करू नका, अपक्षाची अवस्था ना घर का ना घाट का अशी होते, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची प्रचार सभा पार पडली. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी गडकरींनी विशाल पाटील यांच्यावर कडाडून प्रहार केला.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाण्याच्या रूपाने संजीवनी भेटली
नितीन गडकरी म्हणाले, जतमध्ये आज येताना आकाशातून हिरवागार परिसर बघून मला आनंद झाला. आज जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या याचा तुम्हाला जितका आनंद तितकाच मला आनंद आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाण्याच्या रूपाने संजीवनी भेटली. राज्यात पाण्याची कमी नाही, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश सिचन योजनांचे प्रश्न सुटलेत. जत तालुक्यातील 65 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल.आता संजयकाकाना निवडून द्या हा ही प्रश्न सोडून देऊ.
घटनेत बदल करणार असा अपप्रचार काँग्रेसचे लोक करतात
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, भाषण करून काही बदलणार नाही. आज शेतकऱ्यांना म्हणावी तशी किंमत नाही,शेतकऱ्यांच्या मालाला किंमत कमी आहे. भाजप घटनेत बदल करणार असा अपप्रचार काँग्रेसचे लोक करत आहेत. संविधानामधील कलमे बदलली जाऊ शकतात. काँग्रेसने संविधान तोडण्याचे 80 वेळा काम केलं. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संविधान तोडले.
10 वर्षात एकही घोटाळा झाला नाही
शिवशाही आणि रामराज्य असणारा हिंदूस्थान आपल्याला घडवायचा आहे. राजकारणामध्ये मी खासदार, आमदार बनायला आलो नाही. मी कधीही कुणाच्या गळ्यात हार घातला नाही. सर्वात चांगले काम करणारे आमदार म्हणून राम सातपुते व समाधान आवताडे यांचे नाव आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या सातपुते यांना उमेदवारी दिली. आता खासदार झाल्यावर तुम्ही पुढच्यावेळी हजारोंचे मोर्चे काढून सातपुते यांना उमेदवारी द्या म्हणाल. 55 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पूर्वी 1 रुपयाचे 15 पैसे येत होते, आता 1 रुपयाला 1 रुपया पोहोचतात. पूर्वी 36 मोठे घोटाळे झाले. 86 लाख कोटींचे घोटाळे झाले. पण मोदींच्या 10 वर्षात एकही घोटाळा झाला नाही, असा दावाही नितीन गडकरी यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या